Pune Weather Update : उन्हाच्या तडाख्यापासून पुणेकरांना दिलासा; वातावरणात गारवा पसरणार; हवामान खात्याचा अंदाज
मागील काही दिवसांपासून पुणेकरांना चांगल्याच उन्हाच्या झळा बसत होत्या. मात्र याच उन्हाच्या उकाड्यापासून पुणेकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. किमान तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
पुणे : मागील काही दिवसांपासून पुणेकरांना चांगल्याच उन्हाच्या (Pune Weather Update) झळा बसत होत्या. मात्र याच उन्हाच्या उकाड्यापासून पुणेकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभाग (IMD) पुणे यांनी किमान तापमानात (Weather Forecast) घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर भागात आज (23फेब्रुवारी) 11.7 अंश सेल्सिअस, एनडीए 9.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वारा शांत आहे, त्यामुळे पुढील काही दिवस किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत आकाश निरभ्र राहील आणि उत्तर ेकडील वारे पुणे आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात प्रवेश करतील यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होईल. तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने घट होईल. पुण्यातील तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने घट होऊन ते 10अंश सेल्सिअस किंवा त्याखाली जाण्याची शक्यता आहे. सर्वात कमी तापमानातील ही शेवटची घसरण असू शकते.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शहरातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी 18फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर येथे15.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 20 फेब्रुवारीला ते 13 अंशांपर्यंत घसरले. गेल्या चोवीस तासात एक अंश सेल्सिअसने घसरलेल्या कमाल तापमानातही काहीशी घट झाली आहे. जिल्ह्यातील सर्वात कमी तापमान काही ठिकाणी 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. हवेली तालुक्यात किमान तापमान 10.9 अंश सेल्सिअस, शिरूर आणि एनडीए भागात 11.1अंश सेल्सिअस होते.
25, 26 फेब्रुवारीला विदर्भ-मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल, राज्यात कोकण वगळता काही भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील अकोला आणि बुलढाणा हे दोन्ही जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, पुण्यात तसं कोरडं हवामान पाहायला मिळेल, तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाची बातमी-
- Supriya Sule baramati : तिकडे सुनेत्रा पवार मैदानात, दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी कंबर कसली; नणंद-भावजयी बारामतीच्या दौऱ्यावर
- Pune Drugs Racket : पुणे ड्रग्स रॅकेटचं गोवा कनेक्शन उघड; सांगलीतून थेट गोव्यात सुरु होता ड्रग्स पुरवठा