Pune Drugs Racket : पुणे ड्रग्स रॅकेटचं गोवा कनेक्शन उघड; सांगलीतून थेट गोव्यात सुरु होता ड्रग्स पुरवठा
सांगलीतून जप्त केलेले ड्रग्स गोव्यात देखील पाठवण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. मोठा प्रमाणात ड्रग्स गोव्यात देखील पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यासोबतच पुण्यातील ड्रग्ज दिल्ली व्हाया पंजाब आणि हरियाणात गेले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पुणे : देशातील सर्वात (Pune Crime News) मोठं ड्रग्स रॅकेट (Pune Drugs) पुणे पोलिसांनी उघड केलं आहे. आतापर्यंतच तब्बल 4000 कोटींचं ड्रग्ज (Mephedrone) पुण्यात जप्त करण्यात आलं आहे. याचं सांगली कनेक्शनदेखील समोर आलं होतं. यातच सांगलीतून जप्त केलेले ड्रग्स गोव्यात देखील पाठवण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. मोठा प्रमाणात ड्रग्स गोव्यात देखील पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यासोबतच पुण्यातील ड्रग्ज दिल्ली व्हाया पंजाब आणि हरियाणात गेले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या पुणे गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत कुपवाडमध्ये मिठाच्या पोत्यात लपवून ठेवलेले 300 कोटींचे 140 किलो एमडी ड्रग जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी आयुब मकानदारसह दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं. तपास पथकाने कुपवाड स्वामी मळा येथे एका गोडाऊनवर छापा टाकला होता. यामध्ये 140 किलोची ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात 300 कोटींच्या आसपास किंमत असलेले ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. पुणे पोलीस आणि सांगली पोलिसांच्या मदतीने कुपवाडमधील स्वामी मळा येथे एका गोडाऊनवर छापा टाकून तपासणी केली असता त्या ठिकाणी मीठाच्या पोत्यात लपवून ठेवल्याचे निदर्शनास आलं होतं. यातील काही माल हा गोव्यात विक्रीसाठई पाठवण्यात आल्याचं समोर आलं आहे.
सांगतील अटक करण्यात आलेला आयुब मकानदारवर यापूर्वीही ड्रग तस्करीचा गुन्हा दाखल होता. तसेच तो सात वर्ष येरवडा कारागृहात होता. कारागृहात पुण्यातील आरोपीची मकानदार याची ओळख झाली होती. त्यामुळे मकानदारकडे हा साठा तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यासाठी पाठवण्यात आला होता याची माहिती मिळताच पुणे क्राईम ब्रँच आणि कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी छापेमारी केली होती.
पुणे पोलिसांच्या कोणत्या कारवाईत किती ड्रग्ज जप्त करण्यात आले?
-दिल्लीत 600 किलो एम डी ड्रग्ज जप्त, दुसऱ्या कारवाईत 1200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
-तीन 4 हजार कोटी रुपयांचे 2 हजार किलो एम डी ड्रग्ज जप्त
-पुणे पोलिसांकडून पुणे, कुरकुंभसह दिल्लीत छापेमारी
-सोमवार पेठेतील छापेमारीमध्ये 2 किलो जप्त
-विश्रांतवाडी येथील गोदामातून 100 कोटीपेक्षा अधिक किंमतीचे 55 किलो ड्रग्ज जप्त
-कुरकुंभ एमआयडीसीमधील एका कारखान्यात 1100 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
-दिल्लीत 800 कोटी रुपयांचे 400 किलो एमडी ड्रग्ज जप्त
-आणखी एका कारवाईमध्ये दिल्लीत 1200 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे 600 किलो ड्रग्ज जप्त
इतर महत्वाची बातमी-