(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Weather News: रेकॉर्डब्रेक पावसामुळे उडाली पुणेकरांची दाणादाण, 86 वर्षांनी ढगांनी पाण्याचा इतका रतीब घातला
Pune Rain : संपूर्ण पुणे शहराला मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत पाणी शिरलं. सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारंबळ उडाली.
पुणे : पुणे शहरासह (Pune Rain) जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने गेल्या 24 तासांत सप्टेंबरमधील सर्वाधिक पाऊस पडला आहे. पुण्यात दोन दिवसापासून पावसाने पुण्याला झोडपले आहे. पुण्यात मागच्या 24 तासांत 133 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 5 ऑक्टोबर 2010 नंतर प्रथमच पुण्यात एवढा पाऊस पडला आहे. पुण्यातील पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच दौरा देखील रद्द करण्यात आला आहे.
संपूर्ण पुणे शहराला मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत पाणी शिरलं. सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारंबळ उडाली. यामुळे लोकांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. पुण्यात मागील 24 तासात 133 मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंतची तिसरी सर्वोच्च पावसाची आकडेवारी आहे. पुण्यात मागील 24 तासात झालेला पाऊस हा सप्टेंबर महिन्यातील सर्वाधिक पाऊस आहे. तर आतापर्यंतची तिसरी सर्वाधिक पावसाची आकडेवारी आहे.
मागील 24 तासात 133 मिमी पावसाची नोंद
याआधी पुण्यात 5 ऑक्टोबर 2010 रोजी 181.1 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर 17 ऑगस्ट 1987 रोजी 141.7 मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच इतका मोठा पाऊस मागील 24 तासात काल झाला. ज्यामध्ये मागील 24 तासात 133 मिमी पावसाची नोंद झाली आहे . मागील अनेक वर्षातील सप्टेंबर महिन्यातील पावसाच्या आकडेवारीचा विचार केला तर याआधी 21 सप्टेंबर 1938 रोजी 132.2 मिमी पाऊस झाला होता. तर 26 सप्टेंबर 1971 रोजी 1153 मिमी पाऊस झाला होता.
पुण्यासाठी देखील रेड अलर्ट जारी
राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात आज देखील मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आले आहे. पुण्यासाठी देखील रेड अलर्ट जारी करण्यात आली आहे. घाट माथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही सर्वत्र पावसाच्या सरी कोसळणार
ठाण्यात देखील वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज, रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरसाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांना उद्या आॅरेंज अलर्ट जारी केला आहे. काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही सर्वत्र पावसाच्या सरी कोसळणार सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा :