एक्स्प्लोर

Pune Wari Accident: विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत

वारकऱ्यांना घेऊन निघालेला टेम्पो उलटल्याची घटना कात्रज -कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात रविवारी रात्री घडली आहे. हा टेम्पो परभणी वरून पंढरपूरकडे निघाला होता.

Pune Accident News Update : विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला (Pandharpur)   जाणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोला पुण्यात किरकोळ अपघात झाला आहे.  वारकऱ्यांचा टेम्पो उलटून पाच  वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत झाली आहे.   पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर ही  घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.   याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.   जखमी वारकऱ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. जखमींमध्ये बहुतांश महिला वारकरी दिसून येत आहेत.  

हातात भगव्या पताका, डोक्यावरी तुळस, टाळ - मृदंगाचा गजर आणि माऊली - तुकोबांचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात माऊलींची आणि  संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल झाली आहे. लाखो वारकऱ्यांचा मेळा पंढरीच्या दिशेने निघाला आहे. दोन्ही पालखीचे पुण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान वारकऱ्यांना घेऊन निघालेला टेम्पो उलटल्याची घटना कात्रज -कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात रविवारी रात्री घडली आहे. हा टेम्पो परभणी वरून पंढरपूरकडे निघाला होता.  यातले वीस वारकरी हे मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना घडली आहे. कात्रज कोंढवा रस्त्यावर चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने अपघात झाला.  पाचही वारकऱ्यांना उपचार देऊन सोडण्यात आलं आहे. 

नेमका कसा झाला अपघात?

प्रयागबाई नारायण बोखारे (वय 72, रा. फुकटगाव, जि. परभणी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, टेम्पोचालक नवनाथ लक्ष्मणराव चोपडे (रा. धार, जि. परभणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कात्रज – कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात गल्ली क्रमांक एक येथे टेम्पोचालक चोपडे याचे नियंत्रण सुटले. टेम्पो उलटून टेम्पोतील वारकऱ्यांना दुखापत झाली.

आज दोन्ही  पालख्या पुण्यात 

आषाढी वारीसाठी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह होता. हातात भगव्या पताका आणि मुखात विठू माऊलीचा जप करत त्यांची दिंडी पुण्यात पोहोचली आहे.  संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात तर माऊलींची पालखी  भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी आहे. पुणेकरांना संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी तसेच वारकऱ्यांच्या सेवेसाठी  आजचा  पूर्ण दिवस मिळणार आहे.

हे ही वाचा :

पालखी सोहळा प्रमुखांना आषाढी महापूजेत सहभागी करायचा निर्णयच नाही, मंदिर समिती अध्यक्षांच्या वक्तव्याने नवा वाद होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Ratnagiri Speech : एकदा सत्ता द्या.. केरळ, गोव्याला मागे टाकू; राज ठाकरेंचं आश्वासनUddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजलेABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Embed widget