Pune News : अवकाळी पावसानं झोडपलं; वारा, गडगडाट, पाऊस अन् गारपीट, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Pune Unseasonal Rain: दोन दिवस पुणे शहरात हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे वेधशाळेकडून शहरात जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला होता. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
Pune News : पुणे शहरात (Pune) रात्री (Pune Rain) पुन्हा पावसाने जोर धरला होता. पुण्यासह ग्रामीण भागांत देखील पाऊस पडला. दोन दिवस पुणे जिल्ह्यासह काही जिल्ह्यात मुसळधार (Rain Updates) पावसाचा इशारा देण्यात आला होता. कोथरूड, धनकवडी, स्वारगेट, सहकार नगर परिसरात गारांचा पाऊस झाला आहे. दोन दिवस पुणे शहरात हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे वेधशाळेकडून शहरात जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला होता. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं (Farmer) मोठं नुकसान झालं आहे.
अवकाळी पावसानं (Pune District) राज्यभर धुमाकूळ घातला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. काल पुण्यातही जोरात पाऊस झाला. काही भागांत मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. रस्त्यावर गारांचा खच पडला होता. दिवसभर पुण्यात उकाडा जाणवत होता. त्यामुळे पावसामुळे पुणेकरांची उकाड्यापासून सुटका झाली होती. अचानक आलेल्या पावासाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
शेतकऱ्यांचं मोठं नुकसान...
शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली होती, याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला होता. दरम्यान, पुणे जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचं आणि फळपिकांचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र एप्रिल महिन्यात झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा नुकसान झालं आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मोठा फटका सहन करावा लागत आहे.
ग्रामीण भागात मोठं नुकसान
पुणे आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लावला आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात अेनक शेतकऱ्यांची पिकं आडवी झाली. शिवाय कैऱ्या गळून पडल्या आहेत. उभी पिकं आडवी झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. हाती आलेलं पिक गेल आता वर्षभर काय करणार, अशा भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्या आहेत.
कात्रज घाट बनला मिनी कश्मिर...
पुण्यात मागील दोन दिवसांपासून संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. त्यातच वेधशाळेने पुढील दोन दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. आज झालेल्या गारपीटीने पुण्यातील कात्रज घाटाला मिनी काश्मिरचं स्वरुप प्राप्त झालं होतं. या गारपीटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काश्मिर नाही तर कात्रज घाट आहे, असं कॅप्शन देत नेटकरी गारपीटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.