एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या 700 जणांना ई-चलनद्वारे दंड
पुणे : वाहतूक नियम मोडणाऱ्या 700 वाहनधारकांना पुणे वाहतूक पोलिसांनी ई-चलनद्वारे दंड आकारला आहे. शहरात सीसीटीव्ही बसवल्यानंतर पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांना थेट मेसेजद्वारे दंडाची नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे.
झेब्रा क्रॉसिंग, दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे, हेल्मेट न वापरणे, फॅन्सी नंबरप्लेट वापरणे अशा नियमांचं पालन न करणाऱ्या 700 दुचाकीस्वारांना आतापर्यंत ई-चलन पाठवण्यात आलं आहे.
ई-चलन पाठवल्यानंतर दंडाचे पैसे संबंधित वाहतूक विभागाकडे द्यावे लागतील. ऑनलाईन पैसे देण्याचीही सुविधा करण्यात आली आहे. दररोज 8 ते 10 जण दंड भरतात. आतापर्यंत 35 जणांनी दंड भरला आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिली.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना ई-चलन पाठवण्यासाठी शहरातील विविध चौकात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. यासाठी पोलिसांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 7 लाख वाहनधारकांचा डेटाबेस तयार केला आहे.
शहरात 15 दिवसांपूर्वीच दंड भरण्यासाठी स्वाईप मशिन्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ज्यांना रोखीने दंड भरायचा असेल, ते रोखीने देऊ शकतात, असंही प्रवीण मुंडे यांनी सांगितलं.
दंड न भरल्यास काय होणार?
वाहनधारकाने सात दिवसात ई-चनलने पाठवलेला दंड न भरल्यास त्याच्या नावावर तो दंड तसाच जमा राहिल. संबंधित वाहनधारकाकडून वाहतूक नियम मोडले जातील, तेव्हा तेव्हा ही दंडाची रक्कम वाढत जाईल.
वाहतूक पोलीस संबंधित वाहनधारकाला जेव्हा प्रत्यक्ष पकडतील, तेव्हा एकाच वेळी सर्व दंड द्यावा लागेल. किंवा असं न झाल्यास पोलीस संबंधित वाहनधारकाची आरटीओकडून माहिती घेऊन कारवाई करतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
Advertisement