एक्स्प्लोर

Pune Terrorist Case : दहशतवाद्यांनी साडीचं दुकान लुटलं अन् बॉम्बचं साहित्य खरेदी केलं; ATS च्या तपासात माहिती समोर

सातारा दरोड्यातील पैशांचा वापर दहशतवाद्यांनी बॉम्ब बनविण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी केला होता. पुणे एटीएसच्या तपासात ही बाब समोर आली आहे.

पुणे : सातारा दरोड्यातील पैशांचा वापर दहशतवाद्यांनी (Pune Terrorist Case) बॉम्ब बनविण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी केला होता. पुणे एटीएसच्या तपासात ही बाब समोर आली आहे. पुणे एटीएसने तीन दहशतवाद्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर केले. हे तिन्ही दहशतवादी एनआयएच्या कोठडीत तुरुंगात होते. या दहशतवाद्यांनी सोनं आणि साडीचं दुकान लुटल्याचं आणि त्यातून बॉम्ब खरेदी केल्याचं समोर आलं आहे. 

तीनपैकी दोन दहशतवाद्यांनी साताऱ्यातील साडीचे दुकान लुटले. दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून एक लाख रुपये लुटण्यात आले. पुणे एटीएसच्या पथकाने मोहम्मद शाहनवाज आलम शफिउज्जमान खान ऊर्फ अब्दुल्ला उर्फ इब्राहिम (31), मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी उर्फ छोटू आणि झुल्फिकार अली बडोदावाला ऊर्फ लाला ऊर्फ लालाभाई (44) यांना न्यायालयात हजर केले होते. सातारा दरोडा प्रकरणी 28 वर्षीय दुकानदाराने सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. अजिंठा चौकातील गणपती सिल्क साडी सेंटरमध्ये 8 एप्रिल रोजी बंदुकीचा धाक दाखवून दोन अनोळखी व्यक्तींना अटक करण्यात आली होती.

हे तिघेही इसिस संघटनेचे सदस्य असून दहशतवादी घटना घडविण्यासाठी तिघांनी मिळून सातारा दरोड्याचा कट रचला होता नंतर त्याने पैशांचा वापर करून बॉम्ब बनवण्याचे साहित्य विकत घेतले. न्यायालयाने तिन्ही दहशतवाद्यांना 21 मार्चपर्यंत पुणे एटीएस कोठडी सुनावली आहे. 

हे सगळं करुन या तिघांनी पुण्यातील आजूबाजूच्या परिसरात बॉम्बस्फोटाचा सराव केला होता. दहशतवादी जंगलात तंबू ठोकून काही दिवस राहिले देखील होते. पुण्याजवळच्या पानशेत जवळच्या दाट झाडींमध्ये, त्याचबरोबर सातारा शहराच्या जवळ असलेल्या झाडींमध्ये तर कोल्हापूर जिल्ह्यातील आंबोलीच्या जंगलात या दहशतवाद्यांनी हा सराव केल्याचं समोर आलं होतं

ISIS, ज्याला इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS), Daish, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP), ISIS विलायत खोरासान, आणि इस्लामिक स्टेट म्हणूनही ओळखले जाते. इराक आणि शाम खोरासान (ISIS-K), सक्रियपणे भारतविरोधी अजेंडा राबवत आहे आणि हिंसक कृत्यांच्या मालिकेद्वारे देशभरात दहशत आणि हिंसाचार पसरवत आहे. या सगळ्या संस्थांमध्ये हे दोघे काही प्रमाणात संलग्न असल्याचं समोर आलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

 Model Code Of Conduct : आचारसंहिता म्हणजे काय रे भाऊ? निवडणूक आयोग उमेदवारावर कधी कारवाई करतो? 14 प्रश्नांमध्ये जाणून घ्या A टू Z माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणाMuddyache Bola : सांगोल्यात शहाजीबापूंच्या कामावर जनता किती समाधानी?Ashish Shelar PC : उद्धव ठाकरे...फेकमफाक बंद करा; आशिष शेलार संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget