Pune Swarget Crime: स्वारगेट डेपोमध्ये उभ्या असलेल्या जुन्या बसमध्ये हादरवणारं दृश्य; साड्या, शर्ट, अंतर्वस्त्र अन् कंडोमची पाकिटं
Pune Swarget Crime: रोज असंख्या लोकांनी गर्दी ये-जा असणाऱ्या स्वारगेट परिसरामध्ये अन्य काही घटना घडत असाव्यात असं काहीसं चित्र बस डेपो परिसरामध्ये दिसून येत आहे.

पुणे: राज्यात सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बलात्कार, खून, चोऱ्या, दरोडे, कोयत्याने हाणामारी, अशा घटना वाढतानाचं चित्र आहे. अशातच काल (मंगळवारी) स्वारगेट बस स्थानकामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात घडलेल्या या प्रकरणामुळे पुणे हादरलं आहे. फलटणला निघालेल्या एका तरूणीवर एक नराधमाने अतिप्रंसग केल्याची घटना समोर आली आहे. नराधम आरोपीचं नाव दत्तात्रय गाडे आहे, हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी गंभीर गुन्हे नोंद आहेत. चेन स्नॅचींग सारखे गुन्हे त्याच्यावरती आहेत. पोलिसांकडून या नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. रोज असंख्या लोकांनी गर्दी ये-जा असणाऱ्या स्वारगेट परिसरामध्ये अन्य काही घटना घडत असाव्यात असं काहीसं चित्र बस डेपो परिसरामध्ये दिसून येत आहे.
पुण्यातील स्वारगेट बस स्टॉपच्या परिसरात पार्क केलेल्या आणि जुन्या बसेसमध्ये असं काही सामान आढळ्याने या ठिकाणी काय काय घडत असेल अशी शंका आता उपस्थित झाली आहे. कंडोम, साड्या, अंतर्वस्त्र, स्वारगेटच्या बंद असलेल्या बसमध्ये आढळून आले आहेत. रात्रीच्या वेळी या बसमध्ये काय प्रकार घडत असतील याचा अंदाज यावरून बांधता येऊ शकतो. त्यामुळे आता एसटी बसस्थानक सुरक्षित नसल्याचं चित्रांतून स्पष्ट होत आहे. स्वारगेट बस स्थानकामधून रोज हजारो लोक ये-जा करतात. या घटनेने आता परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
स्वारगेटमध्ये अत्याचार झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण
स्वारगेट बस स्थानकामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात घडलेल्या या प्रकरणाने पुणे हादरलं आहे. नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी गंभीर गुन्हे नोंद आहेत. चेन स्नॅचींग सारखे गुन्हे त्याच्यावरती आहेत. पोलिसांकडून या नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. त्यामध्ये ही तरुणी आरोपी सोबत काही वेळ बोलत होती आणि त्याने तिची दिशाभूल करून, तिला खोटं सांगून बसमध्ये नेलं आणि अत्याचार केला. ती मुलगी काही वेळ त्याच्याशी बोलताना सीसीटीव्हीत दिसत आहे.
मित्राला फोन लावला अन्....
ही तरुणी ज्याठिकाणी बसली होती, तिच्या शेजारी आणखी एक व्यक्ती होती. आरोपी तरुणीशी बोलायला आल्यानंतर हा व्यक्ती निघून गेला. त्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे याने तरुणीशी गोड बोलून ओळख काढली. कुठे जाते ताई? असे त्याने तरुणीला विचारले. त्यावर तरुणीने आपल्याला फलटणला जायचे असल्याचे सांगितले. त्यावर दत्तात्रय गाडे म्हणाला की, सातारची बस तिकडे लागली आहे. त्यावर तरुणी म्हणाल की, सातारची बस इकडेच लागते म्हणून मी इथे बसलेय. पण आरोपीने तरुणीला बस दुसरीकडे लागली आहे, मी तुला तिकडे घेऊन जातो, असे सांगितले. तेव्हा ही तरुणी आरोपीच्या पाठीमागे चालत गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.























