Kirit Somaiya : उद्धव ठाकरे, लाइफलाइन कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पून्हा शिवाजी नगर पोलीस ठाण्यात सुजित पाटकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
![Kirit Somaiya : उद्धव ठाकरे, लाइफलाइन कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; किरीट सोमय्या pune shivajinagar covid center case a case of culpable homicide should be filed against uddhav thackeray and life line company in shivajinagar covid center case demand kirit somaiya Kirit Somaiya : उद्धव ठाकरे, लाइफलाइन कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; किरीट सोमय्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/3c4bd8aa8a9b677afb5e9e0d9a4185671681130727215442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या पुण्यातील जम्बो कोविड (kirit somaiya) सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पुन्हा शिवाजी नगर पोलीस ठाण्यात सुजित पाटकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि लाइफलाइन कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे केली आहे.
पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये कोरोना काळात मोठा घोटाळा झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे काम अस्तित्वात नसलेल्या लाइफ लाइन कंपनीला उद्धव ठाकरे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. याचदरम्यान अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असं ते म्हणाले.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन कंपनीला कोरोना काळात शिवाजीनगर येथे कोविड सेंटर उभारण्यास परवानगी दिली होती. त्यावेळी ती कंपनी अस्तित्वात नव्हती. सर्व नियम डावलून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी हे काम संबंधित कंपनीला दिले. त्यावेळी कशा प्रकारे बिलं दिलं जात होती, ते आपण सर्वांनी पाहिले आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमधील शंभर रुग्णांचे शारीरिक नुकसान झाले आहे. काहींची किडनी खराब झाली आणि काहींना हृदयाचा त्रास सुरु झाला. त्याच प्रमाणे जम्बो कोविड सेंटरमध्ये अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. या सगळ्यांचा मृत्यू फक्त कोविड सेंटरच्या हलगर्जीपणामुळे झाला. या सगळ्यानंतर या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते, असंही ते म्हणाले.
ब्लॉक लिस्ट झालेल्या कंपनीला पुन्हा काम कसं दिलं?
ही सगळी बाब समोर आल्यावर आणि कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये केल्यानंतरही संबंधित कंपनीविरोधात तत्कालीन सरकारने कोणत्याही प्रकराचा फौजदारी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीदेखील वरळी मतदारसंघात लाइफ लाइन कंपनीला काम दिले. ब्लॉक लिस्ट झालेल्या कंपनीला पून्हा काम कसं दिलं जातं, असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
खोटी कागदपत्र दाखवली
पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीनं बोगस कागदपत्रं दाखवून खोट्या पद्धतीनं कोविड सेंटरचं कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. पुरेशी क्षमता नसल्यानं अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)