Pune Crime: पुण्यातील नराधम डान्स शिक्षकाचे कारनामे दोन वर्षांनी उघड; माहिती देताना पोलिस म्हणाले, 'अजून काही तक्रारी येण्याची शक्यता...'
Pune Crime: अन्वित पाठक अस संस्थाचालकाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, या प्रकरणात अजून काही तक्रारी येण्याची शक्यता असल्याचं पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले आहे.
Pune Crime : पुण्यातील (Pune Crime ) नामांकित शाळेतील (Pune School) अल्पवयीन मुलांवर डान्स टिचरकडून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दरम्यान, या प्रकरणी आता पोलिसांनी शाळेतील डान्स टिचरसह संस्थाचालकाला अटक केली आहे.अल्पवयीन मुलांचा डान्स टिचरने लैंगिक छळ केल्याप्रकरणी नामांकित शाळेच्या संस्थाचालकाला अटक करण्यात आली आहे. अन्वित पाठक अस संस्थाचालकाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, या प्रकरणात अजून काही तक्रारी येण्याची शक्यता असल्याचं पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले आहे.
काय म्हणालेत पोलीस उपायुक्त संभाजी कदम?
पुण्यातील एका नामांकित शाळेत चौथ्या वर्गाची होणाऱ्या आणि सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलावर डान्स टीचरने अश्लील चाळे केले. त्यानंतर या डान्स टीचरला अटक करण्यात आली. त्यासोबत शाळेच्या संस्थाचालक अन्वित फाटक यांना देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्यात एका पालकाने संस्थाचालक असलेल्या अन्वित फाटक यांच्या विरोधात देखील तक्रार दाखल केली होती, त्यावरून पोलिसांनी फाटक यांना अटक केली आहे. त्याचबरोबर दोन विद्यार्थ्यांसोबत ही घटना घडल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पुन्हा दोन पालकांनी आपल्या मुलासोबत असाच घडल्याची तक्रार पोलिसांना दिली आहे. आणि या प्रकरणात अजून काही तक्रारी येण्याची शक्यता असल्याचं पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले आहे.
दोन वर्षे ही बाब लक्षात आली नाही
पुण्यातील एका नामांकीत शाळेत मंगेश साळवे या डान्स टीचरकडून मागील दोन वर्षांपासून शाळेतील मुलांवर लैंगिक अत्याचार केले जात होते. मंगेश साळवे हा शाळेतील सहावी, सातवी मधील मुलांना अनेकदा शाळेच्या बाथरुममध्ये नेऊन त्यांच्याशी अश्लील चाळे करत होता. शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या दोन वर्षे ही बाब लक्षात आली नाही. एका मुलाला मंगेश साळवेकडून शारिरीक इजा झाल्यानंतर त्याने ती बाब त्याच्या पालकांना सांगितली. त्यानंतर आणखी तीन पालकांनी देखील त्यांच्या पाल्याबाबत असाच प्रकार घडल्याची तक्रार दाखल केली आहे. पालकांनी मंगेश साळवे या शिक्षकाबरोबरच संस्थाचालक अन्वित फाटक यांचा आणि संस्थेचा निष्काळजीपणा या अत्याचारांना कारणीभुत ठरल्याची तक्रार पोलीसांकडे केली आहे. पालकांच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षक असलेला मंगेश साळवे आणि संस्थाचालक अन्वित फाटक यांना अटक केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पुण्यातील कर्वेनगर-कोथरूड परिसरातील एका शाळेत आरोपी मंगेश साळवे हा डान्स टीचर म्हणून कार्यरत होता. नृत्य शिकवत असताना साळवे हा शालेय विद्यार्थ्यांच्या शरीराला जाणून बुजून हाथ लावत असे. एका 11 वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्याबाबत घडलेला प्रकार समुपदेशन सुरू असताना सांगितला आणि त्यानंतर त्याच्या आई वडिलांना देखील याबाबतची माहिती दिली आणि तात्काळ त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी सुद्धा प्रकरण गांभीर्याने घेत शिक्षक मंगेश साळवे याला अटक केली. यापूर्वी सुद्धा त्याने इतर विद्यार्थ्यांवर लैंगिक छळ केल्याचे समोर आल होतं. आरोपीवर अशा प्रकारचा गुन्हा केल्याप्रकरणी आणखी एका गुन्हा दाखल करण्यात आला होता.