(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Bogus School : तुुमचं मुल बोगस शाळेत शिकत नाही ना? पुणे जिल्ह्यात 12 शाळा बोगस, पाहा संपूर्ण यादी...
पुणे जिल्ह्यात एकूण 12 शाळा या अनाधिकृत असल्याचं समोर आलं आहे. या 12 शाळांवर आता कारवाई करण्यात आली आहे. या 12 शाळांची (12 bogus school in pune district) यादी जाहीर करण्यात आली आहे.
Pune Bogus School : शिक्षणाचं (Pune) माहेरघर असलेल्या पुण्यात (Pune Bogus School) तुमचं मुल बोगस शाळेत तर शिकत नाही, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण पुणे जिल्ह्यात एकूण 12 शाळा या अनाधिकृत असल्याचं समोर आलं आहे आणि या 12 शाळांवर आता कारवाई करण्यात आली आहे. या 12 शाळांची (12 bogus school in pune district) यादी जाहीर करण्यात आली आहे. या बाराही शाळेत आपल्या पाल्यांचा प्रवेश न घेण्याचं आवाहन केलं आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने देखील अनधिकृत शाळांची तपासणी केली त्यात या 12 शाळा बोगस असल्याचं समोर आलं आहे.
जिल्ह्यात अनधिकृत शाळांची यादीच जिल्हा परिषदेने जाहीर केली आहे. तालुक्यांमध्ये गटशिक्षण अधिकार्यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये बारा शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचा अहवाल शिक्षण विभागाला दिला. या शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नये असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी केलं आहे.
शासनाची मान्यता नसतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्याचा प्रकार समोर आला. या सगळ्या शाळांची मनमानी कारभार थांबवण्यासाठी शिक्षण विभागाने शाळांच्या नावांची यादीच जाहीर केली आहे. यात यामध्ये पुंरदर, खेड, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यांतील शाळांचा समावेश आहे. या सगळ्या कारवाईनंतर काही शाळा बंद करण्यात आल्या होत्या मात्र अजूनही काही शाळा सुरु असल्याचं समोर आलं आहे. अनधिकृतपणे सुरू असलेल्या इंग्रजी शाळांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर आला असल्याचं समोर आलं आहे.
12 शाळांची यादी...
1) मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल, दौंड
2) क्रेयांस प्री प्रायमरी स्कूल, कासुर्डी (दौंड)
3) के.के. इंटरनॅशनल स्कूल, बेटवाडी (दौंड)
4) पुणे इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, लोणीकाळभोर (हवेली)
5) जयहिंद पब्लिक स्कूल, भोसे (खेड)
6) एस.एन.बी.पी. टेक्नो स्कूल, बावधान (मुळशी)
7) अंकुर इंग्लिश स्कूल, जांभे (मुळशी)
8) साई बालाजी पब्लिक स्कूल, नेरे (मुळशी)
9) श्रीनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल, वीर (पुरंदर)
10) कल्पवृक्ष इंग्लिश मिडीयम स्कूल, किरकीटवाडी (हवेली)
11) क्रेझ इंग्लिश मिडीयम स्कूल, कोल्हेवाडी (हवेली)
12) किंडर गार्डन इंग्लिश मिडीयम स्कूल, खडकवासला (हवेली)
राज्यातील शाळांवरही कारवाई
राज्यातील बोगस शाळांवर शासनाच्या प्रचलित धोरणानुसार कारवाई करा, अशी सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना केली आहे.