एक्स्प्लोर

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात नवा ट्वि्स्ट; प्रांजल खेवलकरांच्या तपासाचा अहवाल रुपाली चाकणकरांकडे जाणार

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात बीडमधील एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केलीय.

पुणे : शहरातील एका फ्लॅटवर झालेल्या पार्टीप्रकरणात माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवळकर अडकले असून त्यांच्यासह साथीदारांना पुणे (Pune) पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी, अद्याप न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने एकनाथ खडसेंनी (Eknath khadse) अधिक बोलणे टाळले आहे. तर, रोहिणी खडसे यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची भेट घेतली. प्रांजल खेवलकर पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे शरद पवार आणि रोहिणी खडसे यांच्यात रेव्ह पार्टी संबंधित चर्चा झाली असणार आहे. याप्रकरणी, आता आणखी नवा ट्विस्ट आला आहे. कारण, राज्य महिला आयोगाने (Rupali chakankar) पोलीस आयुक्तांना पत्र लिहून एका बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं पुण्यातील रेव्ह पार्टीसंदर्भाने तक्रार केली असून त्याच्या तपासाचा अहवाल मागवला आहे.

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात बीडमधील एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केलीय. प्रज्ञा खोसरे यांच्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेकडून ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीत प्रांजल खेवलकर यांनी खराडी भागातील ते हॉटेल 28 वेळा बुक करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. खेवलकर यांनी या हॉटेलमध्ये अनेकवेळा मुलींना बोलावल्याचा आरोप देखील करण्यात आला असून हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. 28 वेळा रुम बुक करणे हा संगठीत रॅकेटचा भाग असू शकतो, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. त्यासंदर्भाने राज्य महिला आयोगाकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती. आता, महिला आयोगाने या अर्जानंतर पुणे पोलीस करत असलेल्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, सोशल मीडियात आणि राजकारणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे पुन्हा एकदा आमने सामने आल्या आहेत. कारण, रोहिणी खडसे यांचे पती आरोपी असलेल्या या खटल्याच्या तपासाचा अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर यांच्याकडे पाठवला जाईल. 

दरम्यान, प्रांजल खेवलकर यांना त्यांच्या चार मित्र आणि दोन महिलांसह शनिवारी पहाटे खरडीत पार्टी करताना अटक करण्यात आली होती. या पार्टीत अंमली पदार्थ सापडल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्यानुसार, त्यांच्यावर खटला दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

हेही वाचा

मोठी बातमी! धडाडीचे IAS तुकाराम मुंढेंची बदली, 'या' महत्त्वाच्या खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी, 20 वर्षात 23 बदल्यांचा विक्रम

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'
तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Embed widget