एक्स्प्लोर

Tukaram Mundhe : मोठी बातमी! धडाडीचे IAS तुकाराम मुंढेंची बदली, 'या' महत्त्वाच्या खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी, 20 वर्षात 23 बदल्यांचा विक्रम

Maharashtra IAS Transfer : गेल्या 20 वर्षांच्या कार्यकाळात तुकाराम मुंढे यांची ही 23 वी बदली आहे. त्यांच्या बदलीमुळे दिव्यांग कल्याण विभागातील खाबुगिरीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुंबई : राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढेंच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तुकाराम मुंढे यांची असंघटीत कामगार विभागाच्या आयुक्तपदावरून बदली करण्यात आली असून ते आता राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असतील. तुकाराम मुंढे यांच्यासोबत इतर चार अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. 

तुकाराम मुंढे कोणत्याच सत्ताधाऱ्यांना झेपेनात? 20 वर्षात 23 वी बदली

प्रशासनात काम करताना नियमांवर बोट ठेवून काम करणारे तुकाराम मुंढे हे कोणत्याही सत्ताधाऱ्यांना पंसत नसल्याचं दिसून येतंय. राजकीय नेतृत्वाला, मंत्र्यांना आपल्या मनाप्रमाणे नियमबाह्य गोष्टी करण्यामध्ये तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी अडथळे ठरतात. त्यामुळे नियमानुसार सर्वसाधारणपणे तीन वर्षात बदली होणे अपेक्षित असताना तुकाराम मुंढे मात्र सरासरी एक वर्षेच काम करताना दिसून येतात.

तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे अधिकारी असून गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत त्यांची ही 23 वी बदली ठरली आहे. प्रशासनात काम करताना हा एक वेगळ्या प्रकारे विक्रमच असल्याचं दिसून येतंय.

Tukaram Mundhe Transfer : प्रशासनातील मुजोरी आणि खाबूगिरी संपवण्याचा प्रयत्न

तुकाराम मुंढे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणच्या प्रशासनाला, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. सरकारी कार्यालयात उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसतो. तसेच कार्यालयातील लाल फितीचा कारभार संपवण्यावर मुंढे यांचा भर असतो. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय ते काम करतात.

तुकाराम मुंढेंच्या कारभाराचा सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होत असला तरी राज्यकर्ते आणि प्रशासनातील मुजोर कर्मचाऱ्यांना मात्र ते नकोसे असतात. त्यामुळेच मुंढे यांची काही दिवसांतही बदली झाल्याचं या आधी दिसून आलं.

लालफितीच्या कारभारातून मुक्तता

दिव्यांग कल्याण विभाग तसा दुर्लक्षित विभाग. मात्र तुकाराम मुंडे हे या खात्याचे सचिव म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे आपल्या साध्यासुध्या कामासाठी मंत्रालयाच्या फेऱ्या मारणाऱ्या दिव्यांग बांधवांची प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारातून सुटका होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Maharashtra IAS Transfer List : कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?

1. तुकाराम मुंढे (आयएएस: आरआर: 2005) विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई यांना सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

2. नितीन काशीनाथ पाटील (आयएएस: एससीएस: 2007) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

3. अभय महाजन (आयएएस: नॉन-एससीएस: 2007) विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई यांना व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

4. ओंकार पवार (आयएएस: आरआर: 2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

5. आशा अफजल खान पठाण - सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर यांना महासंचालक, वनमती, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि त्यांना सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूरचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे MPSC चे अध्यक्ष होऊ शकतात, मी चेक केलंय; रोहित पवारांकडून भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी
तुकाराम मुंढे MPSC चे अध्यक्ष होऊ शकतात, मी चेक केलंय; रोहित पवारांकडून भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी
Ajay Baraskar On Manoj Jarange: मोठी बातमी : मनोज जरांगेंविरुद्ध थेट ED मध्ये तक्रार, वाळू तस्करी केल्याचा आरोप, अजय बावसकर आक्रमक
मोठी बातमी : मनोज जरांगेंविरुद्ध थेट ED मध्ये तक्रार, वाळू तस्करी केल्याचा आरोप, अजय बावसकर आक्रमक
मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: 'ज्या अदृश्य शक्तीने गेल्या तीन महिन्यांपासून त्रास दिला, त्यांना जागा दाखवणार, अन्यायाची परतफेड करणार..' गोकुळ निवडणुकीसाठी पात्र 1400 दूध संस्थांचा अदृश्य शक्तीविरोधात एल्गार
'ज्या अदृश्य शक्तीने गेल्या तीन महिन्यांपासून त्रास दिला, त्यांना जागा दाखवणार, अन्यायाची परतफेड करणार..' गोकुळ निवडणुकीसाठी पात्र 1400 दूध संस्थांचा अदृश्य शक्तीविरोधात एल्गार
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
तुकाराम मुंढे MPSC चे अध्यक्ष होऊ शकतात, मी चेक केलंय; रोहित पवारांकडून भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी
तुकाराम मुंढे MPSC चे अध्यक्ष होऊ शकतात, मी चेक केलंय; रोहित पवारांकडून भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी
Mumbai Cat Death: मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
लग्नासाठी 1 लाख द्या, सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी पोर्टल सुरू करा; लग्नाळू युवकाचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
लग्नासाठी 1 लाख द्या, सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी पोर्टल सुरू करा; लग्नाळू युवकाचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
Spiritual: आत्महत्येचे विचार मनात येतात तेव्हा काय करावे? गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा मानव जातीसाठी मोलाचा सल्ला, जाणून घ्याच...
आत्महत्येचे विचार मनात येतात तेव्हा काय करावे? गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा मानव जातीसाठी मोलाचा सल्ला, जाणून घ्याच...
गणेशोत्सव विसर्जन व्यवस्थेचं कंत्राट गैरहिंदूंना नको; भाजपा नगरसेवकाची मागणी, महापालिका आयुक्तांना पत्र
गणेशोत्सव विसर्जन व्यवस्थेचं कंत्राट गैरहिंदूंना नको; भाजपा नगरसेवकाची मागणी, महापालिका आयुक्तांना पत्र
Embed widget