एक्स्प्लोर

Pune Rain Update: पुण्यात संततधार पावसाला सुरूवात; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी, पुढील तीन दिवस महत्त्वाचे

Pune Rain Update: कोकण किनारपट्टी, घाटमाथा, विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Pune Rain Update: पुण्यात पुन्हा संततधार पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात पुन्हा मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात मोसमी पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी, घाटमाथा, विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. घाटमाथ्यावर मध्यम ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

किनारपट्टीवरील हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रातून वेगाने बाष्पयुक्त वारे किनारपट्टीवर येत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे किनारपट्टीसह पश्चिम घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पश्चिम बंगालमधील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम म्हणून उत्तर विदर्भामध्ये, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर (Heavy Rain) वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा

आज कोकणातील रायग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा (IMD Alert) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह ठाणे सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

या जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी 

ऑरेंज अलर्ट - कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया.

यलो अलर्ट  - सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा.

जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 'इतका' पाणीसाठा

पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली आहे. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 90 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा आहे.

पुणे जिल्ह्यातील पानशेत, वरसगाव, टेमघर या तिन्ही धरणात सध्या पाणीसाठा 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने या धरणामध्ये 75 टक्के पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी याच काळात चार ही धरणात 79.66 टक्के इतका पाणीसाठा होता. यावर्षी याच काळात चारही धरणातील पाणासाठा हा मिळून 89.87 टक्के इतका आहे.

जुलै महिन्यामध्ये राज्यात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली. पुणे जिल्ह्यासह (Heavy Rain) घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठा पाऊस (Heavy Rain) होत आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी प्रश्न मिटला आहे. पुणे जिल्ह्याला (Heavy Rain) पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांत 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget