Pune Porshe Car Accident : मोठी बातमी : पोर्शे कार अपघात प्रकरणी नवा ट्वीस्ट, येरवडा पोलिसांवर संशय निर्माण झाल्याने तपास आता गुन्हे शाखेकडे
Kalyani Nagar Pune Porshe Car Accident : पुण्यात कल्याणी नगर येथे झालेल्या अपघात प्रकरणी आता नवा ट्वीस्ट समोर आलाय. येरवडा पोलीस ठाण्यात असलेला अपघाताचा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय.
Kalyani Nagar Pune Porshe Car Accident : पुण्यात कल्याणी नगर येथे झालेल्या अपघात प्रकरणी आता नवा ट्वीस्ट समोर आलाय. येरवडा पोलीस ठाण्यात असलेला अपघाताचा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. त्यामुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कल्याणी नगर पोर्शे अपघाताचा तपास केला जाणार आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून तपास काढण्यात आलाय. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने आणि येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे या प्रकरणाचा पुढील तपास करणार आहेत.
आरोपी विशाल अग्रवालला न्यायालयीन कोठडी
पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला आज (दि.24) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवालला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. पण न्यायालयाकडून पुणे पोलिसांची मागणी फेटाळण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे विशाल अग्रवालला आता जामिन अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झालाय. विशाल अग्रवाल यांच्या वकिलांकडून कधीही जामिन अर्ज केला जाऊ शकतो.
विशाल अग्रवालच्या नावाने फेक व्हिडीओ व्हायरल
पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील अपघातामुळे चर्चेत आलेल्या बिल्डरपुत्राच्या नावाने एक व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओतील रॅप साँगमध्ये शिवीगाळ करण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत होता. मात्र, काहीवेळाच हा धनिकपुत्राचा नसल्याचे स्पष्ट झाले होते. हा व्हीडिओ एका दुसऱ्याच कंटेट क्रिएटरने तयार केला होता. हा कंटेट क्रिएटर आणि पुणे अपघातामधील अल्पवयीन आरोपी यांच्या दिसण्यात सार्धम्य असल्याने हा व्हीडिओ त्याचाच असल्याचा समज झाला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल यांनी स्पष्टीकरण देत एक व्हिडीओ केला. हा माझा मुलगा नसून मुलाचा व्हिडीओ फेक असल्याचं म्हणत शिवानी अग्रवाल यांनी पोलिसांना विनंती केली. यावेळी बोलताना बिल्डरपुत्राची आई ढसाढसा रडली. बिल्डरपुत्राची आई म्हणाली, मी मीडियाला विनंती करते की, व्हायरल होत असलेला व्हिडीओ तो माझ्या लेकाचा नाही. तो फेक व्हिडीओ आहे. माझा मुलगा रिमांड होममध्ये आहे. मी पोलीस कमिशनरांना विनंती करते की, प्लीज माझ्या मुलाला वाचवा... त्याला प्रोटेक्ट करा,
इतर महत्वाच्या बातम्या