एक्स्प्लोर

मोठी बातमी! लातूरमधील आरक्षण आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा; चिठ्ठ्या ‘प्लांट’ केल्याचे निष्पन्न; तीन गु्न्हे दाखल

आरक्षण लढ्यात ज्यांनी आपलं जीवन संपवलं, त्यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या ‘प्लांट’ केल्याचे निष्पन्न झाले आहे. आत्महत्यांच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे

लातूर : राज्यातील आरक्षणाच्या मागणीची लढाई टोकाला पोहोचल्याचं पाहायला मिळालं. मराठा आरक्षण, ओबीसी आंदोलनाचा वाद समाजा-समाजात फूट पाडण्याचे कारण ठरू लागला होता. मराठा समाजाला (Maratha) ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांची होती, तर ओबीसीच्या (OBC) आरक्षणाला धक्का लागू नये, असे म्हणत ओबीसी नेते आक्रमक झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, आरक्षणाच्या या लढाईत काहींनी आत्महत्येसारखे टोकाचं पाऊलही उचललं. मात्र, काही ठिकाणी आत्महत्येचं कारण वेगळंच असल्याचं आता समोर आलं आहे. लातूर (Latur) जिल्ह्यात आरक्षणासाठी आत्महत्येच्या प्रकरणात नवा खुलासा पुढे आल्याने आरक्षण आंदोलन आणि जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी, लातूर जिल्ह्यात तीन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला असून ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे.

आरक्षण लढ्यात ज्यांनी आपलं जीवन संपवलं, त्यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या ‘प्लांट’ केल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आत्महत्यांच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. लातूर जिल्ह्यातील दोन आत्महत्या आणि एका आत्महत्येचा प्रयत्न प्रकरणात आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या संबंधितांनी स्वतः लिहिलेल्या नसून, त्या नंतर ‘प्लांट’ करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या तिन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिस ठाण्यांनी स्वतंत्रपणे गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, या आत्महत्येच्या घटनांचा वापर करून काहींनी सामाजिक आणि राजकीय दबाव निर्माण करण्याचा तसेच शासनाकडून आर्थिक मदत मिळविण्याचा प्रयत्न केला असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

तीन वेगवेगळ्या प्रकरणांचा तपशील

निलंगा तालुका : दादगी प्रकरण:

शिवाजी मेळे यांचा विजेच्या शेगडीला करंट लागून मृत्यू झाला होता. त्यांच्या खिशात “महादेव कोळी समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली” अशी चिठ्ठी सापडली. पोलीस तपासानंतर ही चिठ्ठी त्यांच्या नातेवाईकांनी नंतर ठेवली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

चाकूर तालुका : अनिल राठोड प्रकरण

अनिल बळीराम राठोड यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यांच्या खिशात “बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या” केल्याची चिठ्ठी आढळली. तपासात ती चिठ्ठी बनावट असल्याचे उघड झाले असून, त्यांच्या तीन नातेवाईकांनी ती ठेवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अहमदपूर तालुका : शिंदगी प्रकरण

येथे 26 ऑगस्ट रोजी बळीराम श्रीपती मुळे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारानंतर त्यांचा जीव वाचला. मात्र, तपासात समोर आले की, त्यांच्या चुलत भावाने "मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत आहे" अशी चिठ्ठी त्यांच्या खिशात ठेवली होती.

दरम्यान, या तिन्ही प्रकरणांमध्ये आरोपींवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक आणि खोटी माहिती देण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तसेच कुटुंबांना आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या हेतूने अशा प्रकारची कृती करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या सर्व प्रकरणांत गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती लातूरचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली. राज्यात आरक्षणासाठी आत्महत्येच्या घटना सातत्याने होत असताना, बनावट चिठ्ठ्या प्लांट केल्याचे उघड झाल्याने ही राज्यातील पहिलीच मोठी कारवाई ठरली आहे.

हेही वाचा

हिट अँड रन; बहिणीला कॉलेजला सोडायला जाताना भीषण अपघात, बहिण-भावाचा मृत्यू; बोलेरो अन् ट्रकचालक वाहनांसह फरार

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Satara Crime News: आनेवाडी टोलनाक्याजवळ कट मारण्यावरुन वाद, युवकाला कारच्या दरवाजाला लोंबकळत 3 किमी फरफटत घेऊन गेले; साताऱ्यातील थरार
आनेवाडी टोलनाक्याजवळ कट मारण्यावरुन वाद, युवकाला कारच्या दरवाजाला लोंबकळत 3 किमी फरफटत घेऊन गेले; साताऱ्यातील थरार
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Embed widget