ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 ऑक्टोबर 2025 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31 हजार 628 कोटीचं पॅकेज जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा; खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 47 हजार रोख मदत तर 3 लाख नरेगातून मिळणार, दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे देण्याचा प्रयत्न https://tinyurl.com/yh4s5sjy अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदत, 100 रुपये प्रति कोंबडी, गोठा-दुकानदारांना 50 हजार; परीक्षा शुल्क माफ, CM देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा https://tinyurl.com/eh59wxkr
2. अतिवृष्टीग्रस्तांसाठी हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज, मुख्यमंत्र्यांचा दावा, एकनाथ शिंदे म्हणाले, पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा आमचं पॅकेज मोठं! https://tinyurl.com/zk9rek3z गिरीश महाजनांचा मोठेपणा, मंत्रिपदाचे 1 वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा; 31 लाख 18 हजार 286 रुपयांचे पगारपत्रक दिले https://tinyurl.com/3znybamu
3. तुकडाबंदी अधिनियमातील सुधारणा अन् एसआरए मध्ये क्लस्टर योजना राबविण्यासाठी मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय https://tinyurl.com/yzzmt48j चिमुकल्यांना विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरला बेड्या ठोकणार; विषारी कप सिरपमुळे लहान मुलांच्या मृत्यूनंतर नागपूर महानगरपालिकेने काढले महत्त्वाचे आदेश https://tinyurl.com/msjjwahm
4. परमात्म्याने जे करायला सांगितलं तेच केलं, मला थोडंही दु:ख नाही; सरन्यायाधीश बी.आर. गवईंना बूट दाखवणाऱ्या राकेश किशोरचं वक्तव्य https://tinyurl.com/4rj9vx25 दिल्लीत सरन्यायाधीश लेकावर बूट भिरकावण्याचा प्रयत्न; अमरावतीतून आईची प्रतिक्रिया, म्हणाल्या, कायदा हातात घेऊन अराजकता वाढवण्याचा कोणालाही अधिकार नाही https://tinyurl.com/y6utsysk
5. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाविषयी वादग्रस्त वक्तव्य बुमरँग, शिंदे गटातील सगळ्यांनी हात वर केले, आता रामदास कदमांची सारवासारव; म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे माझं दैवत, माझे काहीच म्हणणे नाही'' https://tinyurl.com/5n7uwjvn रामदासभाईंनी केलेल्या आरोपात तथ्य, बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाविषयी वक्तव्यावर माजी आमदार शहाजीबापूंकडून पाठराखण; म्हणाले, 'त्या काळात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अशीच चर्चा सुरू होती' https://tinyurl.com/49zp7jp8
6. मराठा आरक्षणाबाबतचा 2 सप्टेंबरचा जीआर रद्द होणार नाही, स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार; हैदराबाद गॅझेटियरविरुद्धच्या याचिकेवर हायकोर्टाचं निरीक्षण https://tinyurl.com/y6ch2kmj हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटियरच्या स्थगितीस नकार देताच लक्ष्मण हाके आक्रमक; म्हणाले, सरकारने तातडीने प्रतिज्ञापत्र सादर करावे अन्यथा निवडणुका लांबवाव्यात https://tinyurl.com/3barzz2v
7. आमची घरं उद्ध्वस्त केली तर आम्हीही मागे लागणार, भुजबळांमुळे ओबीसी उद्ध्वस्त होणार; मनोज जरांगेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/4hzttvb9 मनोज जरांगे ओबीसी नेत्यांचा गेम करायची भाषा करत असतील तर आमच्या मनगटात ताकद नाही का? बबनराव तायवाडेंचा संतप्त सवाल https://tinyurl.com/38fyvjps
8. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'मविआला नव्या भिडूची गरज नाही'; मनसेचे नेते म्हणाले, 'तुमच्याकडे परवानगी मागितलेय कुणी?' https://tinyurl.com/bdej38rx लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबे द्या; कोकणवासीयांसाठी शरद पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी https://tinyurl.com/52efj9h5
9. नाशिकचं बिहार होतंय का? नऊ महिन्यांत 45 खुनाच्या घटना, अवघ्या पाच तासात दोघांचा खात्मा; वर्दीचा धाक संपल्याची चर्चा https://tinyurl.com/59wtd824 हिट अँड रन; बहिणीला कॉलेजला सोडायला जाताना भीषण अपघात, लातूर जिल्ह्यातील औसामध्ये बहिण-भावाचा मृत्यू; बोलेरो अन् ट्रकचालक वाहनांसह फरार https://tinyurl.com/37c5zyfe
10. लंडनसारखं भव्य दिव्य, नवी मुंबई विमानतळाची पहिली झलक; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते उद्या लोकार्पण, 1160 हेक्टरवर उभारणी, 1 लाख कोटींपेक्षा अधिक खर्च https://tinyurl.com/4mpz7k4t बीडच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेपाठोपाठ विमानही लँड होणार, MADC संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून बीडजवळील कामखेडा परिसराची पाहणी https://tinyurl.com/542hccxd
*एबीपी माझा स्पेशल*
सोन्या- चांदीचे दर गगनाला, वर्षभरात चांदीच्या दरात तब्बल 70 हजार रुपयांची वाढ; तर सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी https://tinyurl.com/2rfxfs6s
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर 'महाराष्ट्र' सिनेमात पहिला सीन कोणता असेल? अक्षय कुमारचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांचं अभिमानास्पद उत्तर! https://tinyurl.com/34p4juay
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*



















