एक्स्प्लोर
Child Marriage and Trafficking | पालघरमध्ये अल्पवयीन मुलीला ५० हजारांना विकून जबरदस्तीने लग्न
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला ५० हजार रुपयांना विकत घेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संगमगिर तालुक्यातील गाडे कुटुंबाने ही अल्पवयीन मुलगी विकत घेतली होती. हा प्रकार कातकरी समाजाच्या एका मुलीच्या बाबतीत घडला. पहिल्या प्रसूतीनंतर मुलगी झाल्याचा राग मनात धरून आरोपींकडून तिचा छळ करण्यात आला. या प्रकरणी त्या अल्पवयीन मुलीने वाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीचा पती जीवन गाडे आणि दलाल रवी कोरे यांना वाडा पोलिसांनी अटक केली आहे. इतर चार आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. या घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या हक्कांचे आणि संरक्षणाचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















