Pune Porsche car Accident Live Update : पोर्शे कार अपघात प्रकरण : प्रत्येकाचा करेक्ट कार्यक्रम होणार; 'एआय'द्वारे अपघाताची घटना जिवंत करणार
ब्लड रिपोर्ट बदलल्यामुळे डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांना ब्लड रिपोर्ट बदलल्यामुळे पुणे पोलिसांनी थेट अटक केली आहे. यावरुन आता वादंग निर्माण झाला आहे.
LIVE
Background
पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. रोज एकेकाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. यात सोमवारी ब्लड रिपोर्ट बदलल्यामुळे डॉ. अजय तावरे (Dr. Ajay Taware) आणि श्रीहरी हळनोर यांना ब्लड रिपोर्ट (Blood Report) बदलल्यामुळे पुणे पोलिसांनी थेट अटक केली आहे. त्यात आता तावरे यांनी हा कारमाना २०१८ मध्येही केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणावरुन विरोधक टीका करत आहेत तर धंगेकरांनीदेखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
पोर्शेचे जर्मनीचे प्रतिनिधी पुण्यात येण्याची शक्यता; पुणे पोलिसांच्या तपासाला वेग
अपघातातील गाडी पुणे पोलिसांनी केली "पॅक"
पोर्शे गाडीचे तांत्रिक पुरावे नष्ट होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी
पोर्शेचे जर्मनी चे प्रतिनिधी पुण्यात येण्याची शक्यता
जर्मन प्रतिनिधींकडून सुद्धा केली जाऊ शकते हा गाडीची पाहणी
आगामी पाऊस आणि इतर घटकांपासून सुरक्षित राहण्यासाठी पोलिसांनी गाडीला पूर्णपणे झाकले
Pune Porsche car Accident : डॉ अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात झाला व्हॉट्सॲप कॉल
पुणे : पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी अपडेट
डॉ अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात झाला व्हॉट्सॲप कॉल
संशय येऊ नये म्हणून नॉर्मल फोन कॉल न करता व्हॉट्सॲप चा वापर
डॉ अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात व्हॉट्सॲप वरून संभाषण
दोघांचे संभाषण झाल्याचे ‘सीडीआर’ (कॉल डिटेल रेकॉर्ड) वरून समोर
ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलण्यात आला होता
त्यासाठी अल्पवयीन तरुणाचे वडील विशाल अग्रवाल याने ससूनमधील डॉ अजय तावरेला व्हाटसॲप कॉल
डॉ. अजय तावरेंनी आणखी एक चुकीचा अहवाल दिला?
Pune Porsche car Accident : पोर्षे अपघात प्रकरणात अटकेत असणारे वरिष्ठ अधिकारी डॉ अजय तावरेंच्या अडचणी वाढणार आहेत. डॉ. तावरेंनी 2018मध्ये ही असाच एक चुकीचा रिपोर्ट दिल्याचा आरोप शिरूरच्या मुलानी आणि शेख कुटुंबीयांनी केला आहे. रेहाना शेख यांचा 11 ऑगस्ट 2018ला प्रसूती नंतर मृत्यू झाला. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झाला, मात्र संबंधित डॉक्टरने रक्त उपलब्ध करून ठेवलं नव्हतं. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने हा मृत्यू झाल्याचा आरोप रेहाना यांचे भाऊ आणि पती ने केला होता. त्यावेळी डॉक्टर अजय तावरेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमली गेली, मात्र तावरेंनी 27 नोव्हेंबर 2018ला डॉक्टरांच्या बाजूनं अहवाल दिला. मग या कुटुंबाने ब्लड बँकेतून 21 जानेवारी 2019 रीतसर माहिती घेतली, तेंव्हा डॉक्टर तावरेंनी पैश्यांसाठी चुकीचा अहवाल दिल्याचं या दोन्ही कुटुंबियांच्या लक्षात आलं. तावरेंच्या या हव्यासापोटी मुलानी आणि शेख कुटुंबियांना अद्याप न्याय मिळाला नाही. त्यांचा न्यायालयीन लढा सुरू आहे.
'एआय'द्वारे अपघाताची घटना जिवंत करणार
पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यामुळेया प्रकरणाची चौकशीदेखील पुणे पोलीस खोलात जाऊन करताना दिसत आहे. अगदी बारीकसारीक पुरावे पुणे पोलीस गोळा करत आहे जेणेकरुन आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल आणि अग्रवाल कुटुंबियांची अरेरावी कायमची थांबेन. त्यातच आता पुणे पोलीस या सगळ्या अपघाताची माहिती मिळवण्यासाठी अॅडव्हान्स तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. पुणे पोलीस 'एआय'द्वारे अपघाताची घटना जिवंत करणार आहे.