एक्स्प्लोर
Anandacha Shidha scheme : राज्याच्या तिजोरीवर ताण,आर्थिक अडचणीमुळे दिवाळीत'आनंदाचा शिधा' मिळणार नाही
गरिबांसाठी राज्य सरकारने सुरू केलेली 'आनंदाचा शिधा' योजना आता बंद होणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्याच्या तिजोरीवर पडणारा मोठा आर्थिक ताण हे यामागील प्रमुख कारण आहे. 'लाडकी बहीण योजना' आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी द्यावा लागणारा निधी यामुळे राज्याची आर्थिक चणचण वाढली आहे. मंत्री भुजबळ म्हणाले, 'मला खजाल्याचं वाटतंय कारण लाडक्या बहीण योजना जी आहे आपल्याला ती चाळीस हजार कोटी रुपयांवर काहीतरी ते जाते आणि तेवढे पैसे जर आपल्याला काढायचे म्हटले तर सगळीकडेच या गोष्टीचा फटका बसतो.' एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिवजयंती, गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळी या सणांसाठी 'आनंदाचा शिधा' देण्यास सुरुवात झाली होती. मात्र, यंदा गणेशोत्सवातही हा शिधा मिळाला नव्हता. आर्थिक अडचणींमुळे ही योजना कायमची बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement

















