एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pune police : किरण गोसावीला पकडण्यासाठी पुणे पोलीस लखनौला रवाना

Mumbai Cruise Case : क्रूझ पार्टी प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. पंच प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणातील दुसरे पंच आणि साधीदार किरण गोसावी याची अटक अटळ आहे

Mumbai Cruise Case : मुंबईतील क्रूझवरील अंमली पदार्थ पार्टी प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. पंच प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणातील दुसरे पंच आणि साधीदार किरण गोसावी याची अटक अटळ आहे. पुणे पोलिसांचं पथक गोसावीला अटक करण्यासाठी लखनौला रवाना झालं आहे. गोसावीवर आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांच्या तापासासाठी पोलीस त्याचा शोध घेत आहे. फसवणूकप्रकरणी गोसावीविरोधात पुणे पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. सोमवारी सायंकाळी गोसावी याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये तो सरेंडर करण्यासाठी लखनौ पोलिसांकडे गेला समजत होतं. मात्र लखनौ पोलिसांनी गोसावीला अटक करुन घेण्यास नकार दिल्याच समजतेय. इतर ठिकाणी सरेंडर होण्याचा सल्ला लखनऊ लखनऊ पोलिसांनी दिला. गोसावी लखनौमध्ये आहे, हे समजताच पुणे पोलिसांचं पथक रवाना झालं आहे. त्यामुळे आता गोसावीची अटक निश्चित मानली जात आहे. 

प्रभाकर साईलच्या गौप्यस्फोटानंतर गोसावीची ऑडिओ क्लिप व्हायरल?
रविवारी प्रभाकर साईल यानं एबीपी माझाला मुलाखत देताना अनेक गोप्यस्फोट केले. त्याच्या गोप्यस्फोटानंतर समीर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी किरण गोसावी याची एक व्हायरल क्लिप समोर आली. यामध्ये तो लखनौ पोलिसांना  सरेंडर व्हायचेय असं म्हणतोय. तर पोलिस अधिकारी सरेंडर करून घेण्यास गोसावीला स्पष्टपणे नकार देत असल्याचं ऐकायला येतं आहे. इथे का सरेंडर करायचं आहे? असा प्रश्न पोलिस अधिकारी गोसावीला विचारतात. आपल्याला येथील पोलीस स्टेशन जवळ आहे, यामुळे सरेंडर करायचं आहे, असं गोसावी त्या संबधित अधिकाऱ्याला म्हणतो. तर इथे सरेंडर करून घेणार नाही, दुसरीकडे जा, असं सांगत पोलीस अधिकारी किरण गोसावीला नकार देताना ऑडिओ क्लिपमध्ये ऐकण्यास येत आहे.  

गोसावी लखनौमध्ये असल्याचं समजताच पुणे पोलिसांचं पथक तात्काळ रवाना झालं आहे. मुंबईतील क्रूझवरील अंमली पदार्थ पार्टी प्रकरणात पंच आणि साक्षीदार राहिलेल्या गोसावी याच्या विरोधात फसवणूक प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याप्रकरणी पुणे पोलिस त्याला अटक कऱण्यासाठी रवाना झाले आहे. 

गोसावी विरोधात काय गुन्हा?
फसवणूक प्रकरणात फरार असलेल्या गोसावीच्या असिस्टंट शेरबानो कुरेशी हिला पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. मलेशियात नोकरी लावतो, असं अश्वासन देत पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची फसवूण केल्याचा आरोप किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांच्यावर आहे. यासाठी त्यांनी चन्मिय देशमुख याच्याकडून तीन लाख रुपये लुबाडलं. 2018 मध्ये पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात दोघांवरही गुन्हा नोंद करण्यात आला होता.

प्रभाकर साईलनं काय केला गोप्यस्फोट?
क्रूझवरील अंमली पदार्थ पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा तुरुंगात आहे. आर्यन खानच्या सुटकेसाठी किरण गोसावीने शाहरुख खानची मॅनेजर पूजाशी कोट्यवधींची डील केल्याचा आरोप या प्रकरणाती साक्षीदार प्रभाकर साईल याने केला. किरण गोसावीने 25 कोटींची मागणी केली होती. 18 कोटी रुपयात ही डील झाली. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा आरोप प्रभाकर साईलने केला. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत प्रभाकर साईलने घटानास्थळावरील व्हिडिओ आणि फोटोही दाखवत अनेक गौप्यस्फोट केले.  दरम्यान, आर्यनच्या सांगण्यावरूनच आपण शाहरुखच्या मॅनेजरला फोन लावला होता, असं किरण गोसावीचं म्हणणं आहे.

किरण गोस्वामींवर झालेले आरोप
पुण्यातल्या फरासखाना पोलीस ठाण्यात किरण गोसावींवर गुन्हा दाखल आहे. 2018 मध्ये गोसावींनी एका तरुणाला मलेशियात नोकरी लावतो असं सांगितलं आणि त्याच्याकडून ३ लाख रुपये घेऊन फसवणूक केली.
किरण गोसावींवर ठाण्यातल्या कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. नोकरीचं आमिष दाखवून हजारो रुपये उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 2015 सालच्या या प्रकरणात गोसावींना अटकही झाली होती.
मुंबईतल्या अंधेरी पोलीस ठाण्यातही किरण गोसावींवर गुन्हा दाखल आहे. एका व्यक्तीच्या क्रेडिट कार्डवरुन गोसावींनी 17 हजार 500 रुपयांची शॉपिंग केली या प्रकरणात कोर्टात आरोपपत्रही दाखल झालं होतं.

24 दिवसांपासून गोसावी फरार-
2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला एनसीबीचे पंच म्हणून किरण गोसावी यांनी कॉर्डिलिया क्रुझवर छापा मारला होता. त्याच छाप्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सापडला होता. त्याच्या हाताला धरुन घेऊन येतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यानंतर किरण गोसावी एनसीबीच्या कोणत्याही पदावर नसताना, कारवाईमध्ये कसे होते? असा सवाल विचारला गेला.  तेव्हापासून किरण गोसावी बेपत्ता झाले. या कारवाईत पंच म्हणून काम केलेले मनिष भानुशाली समोर आले पण किरण गोसावी मात्र बेपत्ताच झाले. गेल्या 24 दिवसांपासून त्यांचा कोणताही थांगपत्ता नाही. पण पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांनंतर मात्र  किरण गोसावी समोर आलाय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSpecial Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Embed widget