एक्स्प्लोर

100 व्या मराठी नाट्य संमेलनाचा आज शुभारंभ, शरद पवार-अजित पवार एकाच मंचावर येणार?

Pune news : 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा (100th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) आज शुभारंभ होणार आहे.

Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा (100th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) आज शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रभर शतक महोत्सवी नाट्य संमेलन पार पडणार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे पुण्यात नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलंय. तीन दिवस चालणाऱ्या या नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे  आज संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलाय. या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांमधे शरद पवार (NCP Sharad Pawar) आणि अजित पवारांची (NCP Ajit Pawar) नावे आहेत.  गेल्या काही दिवसांमधे अजित पवारांन शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलय. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्यास शरद पवारांसोबत अजित पवार उपस्थित राहणार का? याकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे.

तब्बल 25 वर्षानंतर शहरात नाट्यसंमेलन होणार आहे. याआधी 79 वे नाट्य संमेलन पिंपरी चिंचवड शहरातील मैदानावर झाले होते. त्यावेळी आयोजनाची जबाबदारी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खांद्यावर होती. त्याशिवाय दिवंगत शिक्षणमंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे आणि युवा अजित पवार यांनाही जबाबदारी पार पाडली होती. यावेळी नाट्यसंमेलनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. 

नाट्यसंमेलन कसं असेल? (Natya Sammelan Schedule)

5 जानेवारी 2024 - पुण्यात शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ
6 जानेवारी 2024 - पिंपरी-चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार
7 जानेवारी 2024 - विविध कार्यक्रमांचे आयोजन (महाराष्ट्रातील विविध शाखा व कलावंत सहभागी होणार)

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी संमेलनाचे आयोजन
 
20 आणि 21 जानेवारी 2024  - अहमदनगर
27 आणि 28 जानेवारी 2024 - सोलापूर
4 फेब्रुवारी 2024 - बीड
10 आणि 11 फेब्रुवारी 2024 - लातूर
17 आणि 18 फेब्रुवारी 2024 - नागपूर, मुंबई

काका पुतणे एकाच मंचावर येणार? 

पिंपरी चिंचवड येथे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात काका आणि पुतणे उपस्थित राहणार आहेत, हा शहरात चर्चेचा विषय आहे. याआधी  दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले होते. आता पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत.  

दोघांना मानणारे नेते - 

पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात शरद पवार आणि अजित पवार या दोघांना मानणारे कार्यकर्ते अन् नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर   दोन्ही नेते एकाच मंचावर येत आहेत. पुढील काही दिवसांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. दोन्ही नेते काय बोलणार ? याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

टीका, टिपण्णी होणार का?

शरद पवार आणि अजित पवार यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर राज्यातील राजकारणाला वेगळी दिशा मिळाली आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभागी जाण्याची भूमिका घेतली. तर शरद पवार यांनी विरोधातच राहण्याचं ठरवलं. मागील काही दिवसांमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. अनेकदा दोघांनी एकमेकांवर अप्रत्यक्षरित्या टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता हे दोघेही एकाच मंचावर भाषण करणार आहेत. यावेळी काय बोलणार?, एकमेकांवर टीका टिपण्णी करणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबाांचा इशारा
मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबाांचा इशारा
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines at 2PM 28 January 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्सDhananjay Munde On Resign News : राजीनाम्याच्या मागणीविषयी मी उत्तर देणार नाही- धनंजय मुंडेSandip Kshirsagar PC : तपासानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार, क्षीरसागर संतापलेSandeep Kshirsagar Mumbai : अजितदादांसोबत काय चर्चा झाली? कराड-धनंजय मुंडेंबाबत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबाांचा इशारा
मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबाांचा इशारा
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
Dhananjay Munde emotional : धनंजय मुंडे भावनिक, म्हणाले, मुलांना मित्र काय म्हणत असतील विचार करा!
Dhananjay Munde emotional : धनंजय मुंडे भावनिक, म्हणाले, मुलांना मित्र काय म्हणत असतील विचार करा!
Esther Anuhya case : इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची  लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
Bill Gates Pandemic: जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
Embed widget