एक्स्प्लोर

Bangaluru Cafe Blast Pune Connection: रामेश्वरम कॅफे स्फोटाप्रकरणातील संशयित आरोपी पुण्यात असल्याचा संशय; NIA चं पथक पुण्यात दाखल

बंगळुरुत बॉम्बस्फोट घडवून आणणारा संशयित दहशतवादी पुण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. NIA ने हा संशय व्यक्त केला असून त्यांचं पथक पुण्यात दाखल झालं आहे.

पुणे : बंगळुरू बॉम्बस्फोट (Bangluru Bomb Blast) प्रकरणात आणखी नवनवे खुलासे समोर येत असतानाच आता या बॉम्बस्फोटाचं (Bomb Blast) पुणे कनेक्शन समोर आलं आहे. हा बॉम्बस्फोट घडवून आणणारा संशयित दहशतवादी (Terrorist )पुण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. NIA ने हा संशय व्यक्त केला असून त्यांचं पथक पुण्यात दाखल झालं आहे.  एनआयएकडून पुण्यातील कोंढवा भागात या संशयीताचा शोध घेण्यात आला. मात्र कोढंव्यातील कोणत्या इमारतीत हा शोध घेण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  

यापूर्वी अनेक दहशतवादी पुण्यातील कोंढवा परिसरात सापडले आहेत. त्यामुळे हा आरोपी पुण्यात आल्याचा संशय NIA ला आहे. बॉम्बस्फोट झाल्यानंतर हा दहशतवादी कर्नाटकातील बल्लारीपर्यंत गेला, त्यानंतर बस बदलून तो गोकर्णमार्गे पुण्यात आल्याचा संशय आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूतील ब्रूकफील्ड या उच्चभ्रू परिसरातील रामेश्वरम कॅफेत एक मार्च रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यात 10 व्यक्ती जखमी  झाले होते. त्या स्फोटाचा तपास NIA कडून सुरु करण्यात आला. पुण्यात नेमका कोणत्या इमारतीत NIA तपास करत आहे. याची कोणतीही माहिती अजून समोर आली नाही आहे. 

सीसीटीव्ही फुटेज समोर

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट मोठ्या नियोजनाने करण्यात आला होता. दहशतवादी स्फोट घडवूनही आरोपीला कोणतीही घाई नव्हती आणि तो थंड डोक्याने बाहेर पडत होता. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाला एक आठवडा उलटून गेला तरी आरोपीला पकडण्यात अद्यापही यश आलेलं नाही. त्याचा शोध घेतला जात आहे. त्यात काही सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर येत आहे. त्यात स्फोटा घडवून आणण्यापूर्वी संशयित रामेश्वरम कॅफेमधून सकाळी 11:43 वाजता IED ठेवून निघून गेला. काही मिनिटांनंतर, BMTC बसमध्ये चढला. इथे त्याने फुल स्लीव्ह शर्ट आणि लाइट कॉलरची पोलो कॅप, डोळ्यांवर चष्मा आणि चेहऱ्यावर मास्क घातलेला दिसत होता. त्यानंतर जांभळ्या रंगाचा हाफ टी-शर्ट आणि काळी टोपी घातली असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. 

NIA कडून आरोपीचा शोध सुरु 

हे सगळे सीसीटीव्ही आणि पुण्यातील सीसीटीव्हीपाहून NIA आरोपीचा शोध घेत आहे. यापूर्वी पुण्यात कोंढवा परिसरात दहशतवादी सापडले होते. या आरोपीचा शोध देखील याच परिसरात सुरु आहे. या आरोपीचा शोध घेतल्यानंतर पुण्यात सापडलेल्या दहशतावाद्यांशी काही कनेक्शन आहे का? याचा शोध NIA कडून घेतला जाणार आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Bengaluru Blast : अवघ्या दोन तासांत आरोपीने बदलले कपडे, 3 वेगवेगळे CCTV फुटेज समोर, पोलीस संभ्रमात, तपास यंत्रणाही हैराण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget