Pune Railway Station :मनोरुग्ण थेट पुणे रेल्वे स्थानकाच्या एफओबीवर चढला, उतरणार नाहीच म्हणत हट्टाला पेटला अन्....
पुणे स्टेशनवर धक्कादायक घटना घडली आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या एफओबीवर (फुट ओव्हर ब्रिज, पादचारी पूल) मनोरुग्ण चढला आहे.
![Pune Railway Station :मनोरुग्ण थेट पुणे रेल्वे स्थानकाच्या एफओबीवर चढला, उतरणार नाहीच म्हणत हट्टाला पेटला अन्.... Pune news The psychopath directly boarded the FOB of Pune railway station in pune Pune Railway Station :मनोरुग्ण थेट पुणे रेल्वे स्थानकाच्या एफओबीवर चढला, उतरणार नाहीच म्हणत हट्टाला पेटला अन्....](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/23/bbdea67254d26cfeeb691f554569f8311716446724654442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुणे स्टेशनवर धक्कादायक घटना घडली आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या एफओबीवर (फुट ओव्हर ब्रिज, पादचारी पूल) मनोरुग्ण चढला. त्यावेळी प्रवाशांनी हे पाहिलं आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना या संदर्भात माहिती दिली. त्यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ हालचाली केल्या आणि त्यांनी थेट फुट ओव्हर ब्रिज, पादचारी पूलावर चढून त्या मनोरुग्ण व्यक्तीला थेट उचलून खाली आणलं. यावेळी रेल्वे स्थानकावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
गुरुवाती सकाळीच ही घटना घडली. चढलेला मनोरुग्ण हा खाली उतरणार नाही म्हणत हट्टाला पेटला. त्याला कर्मचाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकायला तयार नव्हता. यावेळी एफओबीवर फार वेळ थांबण आणि मनोरुग्णाने उडी मारण्याचा प्रयत्न केला असता तर मोठा धोका निर्माण झाला असता. या सगळ्या शक्यता पाहून कर्मचाऱ्यांनी त्याला पुन्हा एकदा समजवण्याचा प्रयत्न केला मात्र रुग्ण हट्टाला पेटल्याचं पाहून कर्मचाऱ्यांनी त्याला थेट वर उचललं आणि खाली घेऊन आले. यावेळी मनोरुग्णाने आरडाओरड करण्याचादेखील प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी त्याला थेट खाली आणलं.
विद्यूत तारांचा शॉक लागण्याची भीती
एक मनोरुग्ण एका रेल्वे गाडीवर चढला होता त्यावेळी विद्युत तारांचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अशा मनोरुग्णांना रोखण्यासाठी रेल्वेकडून काय ठोस उपाययोजना केल्या जातात का? असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून केला जात आहे.याबाबत लोहमार्ग पोलीस अधिकारी म्हणाले, या व्यक्तीला आमच्या कर्मचाऱ्यांकडून खाली उतरवण्यात आले असून, त्याची सखोल विचारपूस करण्यात येत आहे. या व्यक्तीकडून खाली उतरण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्याची चौकशी सुरू आहे मात्र व्यक्ती उडवा उडवीची उत्तर देत आहे.
पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे व्हाट्सअप ग्रुप वरून अशी माहिती मिळाली की एक मनोरुग्ण इसम छत्री गेटवरील पत्रे वरती चढलेला आहे. डी बी टीमने शर्तीचे प्रयत्न करून ब्रिजवरील पत्र्यावर चढून खाली उतरवून घेतले. संजय कुमार दरोगी शर्मा (वय 28- वर्षे) असं त्याचं नाव आहे. बिहारचा मुखिया कटियालचा हा व्यक्ती आहे. या व्यक्तीची खाली उतरवल्यावर चौकशी केली मात्र त्यावेळी त्याने उडवाउडवीची दिली अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)