(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zika Virus: पुणेकरांना दिलासा! चार दिवसात झिका व्हायरसची रूग्णसंख्या 'जैसे थे', झिकाची साखळी तुटतेय
Zika Virus: पुणेकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढत असलेली झिका व्हायरसच्या रूग्णांची संख्या सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.
Zika Virus: पुणेकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढत असलेली झिका व्हायरसच्या (Zika Virus) रूग्णांची संख्या सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये झिका व्हायरसचा (Zika Virus) एकही रूग्ण आढळला नसल्याची माहिती आहे. शहरात झिकाची (Zika Virus) साखळी तुटताना दिसत आहे. गेल्या 4 दिवसांपासून झिकाच्या (Zika Virus) नवीन रुग्णांची संख्या घटली आहे. 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान एकाही नव्या रुग्णाची नोंद झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या शहरात 75 रुग्णसंख्या असून, नवीन रुग्णवाढ नसल्याने बाब समोर आली आहे. पुणे शहरात झिकाचा पहिला रुग्ण हा 20 जूनला आढळला होता.
गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. त्यामुळे डासांचे प्रमाण देखील वाढले होते. याच दरम्यानच्या काळात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. आता पाऊस ओसरल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. झिका (Zika Virus) हा डासांमुळे इतरांना पसरणारा आजार असला तरी तो गर्भवती महिलांच्या बाळांसाठी हानिकारक ठरतो. आतापर्यंत 75 पैकी 32 रुग्ण या गर्भवती महिला आहेत. एनआयव्हीच्या मते हा विषाणू एशियन असल्याने तो फारसा हानिकारक नाही. असे सध्या दिसत असले तरी प्रत्यक्ष प्रसूती झाल्यावरच त्याचा खरा परिणाम दिसून येईल.
पुणे शहरात झिका विषाणूचा धोका झाला कमी झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून झिकाच्या नवीन रुग्णांची संख्या घटली आहे. नव्या रुग्णांची नोंद नसल्याने दिलासा मिळाला आहे.
आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू
आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पण या रुग्णांना हृदयविकार आणि यकृताचे आजारही होते, त्यामुळे त्यांची प्रकृती 68 ते 78 वर्षांच्या दरम्यान होती.
गर्भवती महिलांना जास्त धोका
झिका (Zika Virus) मुख्यतः गर्भवती महिलांना प्रभावित करतो, झिका विषाणू गर्भावर परिणाम करू शकतो. या विषाणूमुळे गर्भाच्या मेंदूचा पूर्ण विकास होत नाही. तसेच, झिका व्हायरसमध्ये एक आरएनए जीनोम आढळतो, ज्यामुळे त्यात उत्परिवर्तन जमा करण्याची अधिक क्षमता असते. याशिवाय, बाळाच्या जन्माच्या वेळी देखील त्याची लक्षणे दिसू शकतात. इतर काही लक्षणे दिसू शकतात जसे की मेंदूच्या विकासाचा अभाव, खराब दृष्टी यावरतीही परिणाम होण्याची शक्यता असते.