एक्स्प्लोर

राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?

Maharashtra Assembly Election 2024 : अहमदनगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या माजी मंत्र्याने विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.  

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वेध लागले आहे. दररोज नवनवीन इच्छुक उमेदवारांची नावे समोर येत असून आता अहमदनगरच्या (Ahmednagar News) राहुरी विधानसभा मतदारसंघातून (Rahuri Assembly Constituency) भाजपच्या (BJP) माजी मंत्र्याने विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.  

आगामी विधानसभा निवडणुक ही आपण राहुरी विधानसभा मतदारसंघातूनच लढवणार असल्याचे भाजप नेते माजी मंत्री शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून शिवाजी कर्डिले हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक (Elections 2024) लढवतील अशी चर्चा सुरू झाली होती. 

राहुरीतूनच निवडणूक लढवणार : शिवाजी कर्डिले

त्यातच काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे शिवाजी कर्डिले हे राहुरी ऐवजी श्रीगोंद्यातून निवडणूक लढवतील असं वाटत असताना आता शिवाजी कर्डिले यांनी आपण राहुरीतुनच निवडणूक लढवणार हे स्पष्ट केले आहे. 

2019 सालचा वचपा काढण्यासाठी सज्ज

2019 मध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवाजी कर्डीले हे सज्ज झाले असून राहुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेनेच मला राहुरीतून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला असल्याचं शिवाजी कर्डिले यांनी म्हटले आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते शिवाजी कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून हर्षदा काकडे इच्छुक

अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये (Shevgaon Pathardi Assembly Constituency) इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. हर्षदा काकडे (Harshada Kakade) यांच्या भूमिकेने भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एकेकाळी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या हर्षदा काकडे यांना 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही, मात्र आता मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी करायची किंवा अपक्ष निवडणूक लढवायची असा निश्चय त्यांनी केला आहे. 

आणखी वाचा 

Sujay Vikhe Patil : 'मला संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल', सुजय विखेंनी पुन्हा व्यक्त केली इच्छा, बाळासाहेब थोरातांना आव्हान?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Ahilyanagar Success Story : शाब्बास रं पठ्ठ्या! तीन सख्ख्या भावांची स्पर्धा परीक्षेत यशाला गवसणी! प्रतिकूल परिस्थिती MPSC उत्तीर्ण; उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
शाब्बास रं पठ्ठ्या! तीन सख्ख्या भावांची स्पर्धा परीक्षेत यशाला गवसणी! प्रतिकूल परिस्थिती MPSC उत्तीर्ण; उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Baramati Byelection Election Commission: मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
Shripad Chindam: शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून श्रीपाद छिंदमांचा ‘यू-टर्न’; बॅनरवरील नाव हटवलं, अहिल्यानगरमध्ये चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?
शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून श्रीपाद छिंदमांचा ‘यू-टर्न’; बॅनरवरील नाव हटवलं, अहिल्यानगरमध्ये चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
Embed widget