मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार
मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निर्देशानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी (Shambhuraj Desai) आज महत्वाची बैठक बोलावली आहे.
Shambhuraj Desai : मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निर्देशानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी (Shambhuraj Desai) आज महत्वाची बैठक बोलावली आहे. मंत्रालयात आज दुपारी 4 ते 5.30 वा दरम्यान या तीनही समाजाच्या प्रलंबित विषयाचा आढावा या बैठकित घेतला जाणार आहे.
या विषयांवर होणार चर्चा
सकल मराठा समाजाकडून हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान गॅझेट यांसंदर्भात करण्यात आलेल्या मागणीबाबत मंत्री शंभूराज देसाई हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत. तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या कार्यवाहीबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे. याशिवाय सकल मातंग समाजाकडून अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाची मागणी करण्यात आली होती. त्याबाबतच्या कार्यवाहीबाबत मंत्री शंभूराज देसाई हे स्वतंत्र बैठकीत माहिती घेतली जाणार.
तसेच यावेळी ते अण्णा भाऊ साठे महामंडळ, अण्णा भाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक, लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक यांबाबतही या बैठकीत आढावा घेतला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय सकल धनगर समाजाच्या मागण्यांबाबत रविवारी, 15 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेऊन महत्त्वपूर्ण सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाहीबाबत आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या: