Pune Airport terminal : पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला; 10 मार्चला पंतप्रधान मोदी करणार ऑनलाईन उद्घाटन
मागील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त लागला आहे. येत्या 10 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत.
![Pune Airport terminal : पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला; 10 मार्चला पंतप्रधान मोदी करणार ऑनलाईन उद्घाटन Pune news Pune Airports new terminal building to be inaugurated on March 10 flight operations to begin after 4 to 5 weeks Pune Airport terminal : पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला; 10 मार्चला पंतप्रधान मोदी करणार ऑनलाईन उद्घाटन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/07/6f2feea5d5821167423e8b7795b441201709786919650442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : मागील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पुणे विमानतळाच्या (Pune Airport) नव्या टर्मिनलच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त लागला आहे. येत्या 10 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर 4 ते 6 आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नव्या टर्मिनलवरून उड्डाण सुरु करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी एकाच वेळी ग्वाल्हेर, पुणे, आदमपूर, कोल्हापूर, जबलपूर, दिल्ली, लखनऊ या विमानतळांवरील नवीन टर्मिनल आणि अलिगड, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद आणि श्रावस्ती या विमानतळांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच, वाराणसी, कडप्पा, हुबळी आणि बेळगाव या विमानतळांच्या नवीन टर्मिनलचे भूमिपूजन करणार आहेत. हे प्रकल्प एकूण 12 हजार 700 कोटी रुपयांचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 10 मार्चला दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन होईल.
नवीन टर्मिनलसाठी एकूण किंमत 475 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होऊन काही महिने उलटले आहेत. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनीही जानेवारी महिन्यात या टर्मिनलची पाहणी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनीही पाहणी केली होती. टर्मिनलचे काम पूर्ण होऊही उद्घाटन होत नसल्याने अनेक राजकीय पक्षांनी आंदोनल केले होते. अखेर या टर्मिनलच्या उद्घाटनला मुहूर्त लाभला आहे. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर विमानतळाच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण सुरू केले जाणार आहे.
कसे आहे नवीन टर्मिनल?
एकूण क्षेत्रफळ : 52 हजार चौरस मीटर
तासाला प्रवासी क्षमता : 3 हजार
वार्षिक प्रवासी क्षमता : 90 लाख
वाहनतळ क्षमता : 1 हजार मोटारी
प्रवासी लिफ्ट : 15
सरकते जिने : 8
चेक-इन काऊंटर : 34
एकूण खर्च – 475 कोटी रुपये
मागील काही दिवसांपासून हे विमानतळ कधी सुरु होणार?, यासंदर्भात चर्चा सुरु होती. त्यासोबतच मेट्रोचंही उद्घाटन रखडलं होतं. त्यात काल पुणे मेट्रोला मोदींनी हिरवा झेंडा दाखवला आणि रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गिका सुरु केली. त्यानंतर आता लगेच विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या उद्घाटनाला मुहूर्त लागला आहे. काहीच आठवड्यात हे विमानतळ प्रवाशांसाठी खुलं होणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
PCMC News : कंटेनर चालकांची अरेरावी संपेना! बीआरटी मार्गात विरुद्ध दिशेनं कंटेनर घुसला अन् पुढे....
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)