Pune Crime news : शांतता असलेल्या रस्त्यावर 10-12 जणं आले; तरुणांवर कोयत्याने सपासप वार केले, अन्...; पुण्यात नेमकं काय घडलं?
पुण्यातील तरुणांवर तलवार, कोयत्याने (Koyta Gang) सपासप वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा सीसीटिव्हीदेखील समोर आला आहे.
पुणे : पुण्यातील गुन्हेगारी काही संपायचं नाव घेत (Pune Crime news) नाही आहे. त्यात कोयते घेऊन विविध परिसरात दहशत माजवण्याचे प्रकार तर सुरुच आहे. त्यातच आता पुण्यातील तरुणांवर तलवार, कोयत्याने (Koyta Gang) सपासप वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा सीसीटिव्हीदेखील समोर आला आहे. ही घटना पुणे- पानशेत रस्त्यावर गोऱ्हे बुद्रुक गावाच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर घडली आहे. या घटनेमुळे गोऱ्हे बुद्रुक गावाच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील गोऱ्हे बुद्रुकमध्ये तरुणांवर धारधार शस्त्राने हल्ला केला, काल रात्री 8:30 वाजता ही घटना घडली 10-15 जणांच्या टोळीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात नचिकेत संजय जगताप, ऋषिकेश दिलीप जगताप, निलेश हिरामण शहा हे तीन तरुण जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना पुणे- पानशेत रस्त्यावर गोऱ्हे बुद्रुक गावाच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर घडली आहे.जगताप दुचाकीवरून जात होते. तर एक जण पायी जात होता. त्यावेळेस हा हल्ला करण्यात आला. नेमका हा हल्ला टोळी युद्ध आहे का पूर्व वैमनस्यातून केला आहे याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात येणार आहे. या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास हवेली पोलीस करत आहे.
पुण्यात रोज नवे हल्ले अन् दहशत
पुण्यात मागील सहा महिन्यांपासून कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. त्यांचा हा धुमाकूळ कमी करण्याससाठी पुणे पोलीस प्रयत्नशील आहे. मात्र सध्या बघायला गेलं तर पुण्यात रोज नवी एक टोळी तयार होताना दिसत आहे आणि रोज नवा भाई तयार होताना दिसत आहे. भररस्त्यात मारहाण करणं, गाड्या फोडून दहशत निर्माण करणं, एकमेकांवर क्षृल्लक कारणावरुन हल्ले करणं हे प्रकार सुरुच आहे. भाईगिरीच्या नावाने पुण्यात अनेक परिसरात धुमाकूळ माजवला जात असल्याचं घडत असलेल्या घटनांमधून दिसत आहे. पुण्यातील गुन्हेगारीतील आरोपींचं वय बघितलं तर विशीतील तरुण आरोपी असल्याचं दिसून येत आहे. कॉलेजमध्ये दादागिरीपासून सुरु झालेली गुन्हेगारी मोठ्या टोळ्यांपर्यंत येऊन पोहचतो. त्यामुळे या तरुणांना योग्य मार्गदर्शन करणं आणि त्यांना गुन्हेगारीपासून लांब ठेवणं हे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
PCMC News : कंटेनर चालकांची अरेरावी संपेना! बीआरटी मार्गात विरुद्ध दिशेनं कंटेनर घुसला अन् पुढे....