(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PCMC News : कंटेनर चालकांची अरेरावी संपेना! बीआरटी मार्गात विरुद्ध दिशेनं कंटेनर घुसला अन् पुढे....
पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर मोठा अनर्थ टळलाय. चालकाने थेट कंटेनर बीआरटी मार्गात तो ही विरुद्ध दिशेने घुसवला.
पिंपरी-चिंचवड, पुणे : कंटेनर चालकाने (PCMC News) अरेरावी केल्याचे अनेव प्रकार समोर आले आहे. यात आतापर्यंत अनेकदा अनेकांनी जीव गमावला (Pune Crime news) आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या (Truck Driver) चालकांचे (Accident) असे प्रकार संपायचं नाव घेत नाही आहे. त्यातच पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर मोठा अनर्थ टळलाय. चालकाने थेट कंटेनर बीआरटी मार्गात तो ही विरुद्ध दिशेने घुसवला. रागाच्या भरात त्याने कंटेनर मागे घेण्यास नकार दिला. शेवट सगळ्यांनी हार मानली आणि त्या कंटेनरला जाण्यासाठी रिव्हर्स गाड्या घेऊन जागा दिली.
नेमकं काय घडलं?
पिंपरी-चिंचवड चौकातील हा प्रकार आहे. चालकाने थेट कंटेनर बीआरटी मार्गात तो ही विरुद्ध दिशेने घुसवला. त्याचवेळी समोरून चारचाकी आणि पीएमपीएमएलच्या बस येत होत्या. कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत होता, तो कोणाचंचं ऐकायच्या मनस्थितीत होता. सुदैव इतकंच की, त्यानं कंटेनर जागे वर थांबवला. त्याने कंटेनर रिव्हर्स घ्यावा यासाठी त्याला विनवणी करण्यात आली. पण तो अडून राहिला, शेवटी कंटेनर समोर उभी असलेली कार आणि बस चालकांनी रिव्हर्स घेतली. त्यानंतर कंटेनर चालक सुसाट निघाला, त्यावेळी बेधुंद अवस्थेत असणाऱ्या चालकाने आधी नेहमी प्रवाश्यांची रेलचेल असणाऱ्या पीएमपीएमएल बस स्टॉपला ठोकर दिली, मग बीआरटी मार्गाचे बॅरिगेट ही तोडले. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांकडून या चालकाचा शोध सुरू आहे. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने हे का केलं, हे स्पष्ट होणार आहे.
मद्यधुंद चालकांची अरेरावी संपेनाच!
नागरिकांनी सामंजस्य दाखवल्याने हा सगळा प्रकार सावरला आणि मात्र असे प्रकार आतापर्यंत अनेकदा समोर आलं आहे. मद्यधुंद अवस्थेत चालकांमुळे असे प्रकार सातत्याने पुढे येत आहे. चालकांच्या या मुजोरीमुळे अनेकांचा जीव टांगणीला लागतो. मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवणाऱ्यांवर अनेकदा कारवाई होत असते. मात्र तरीही चालक या सगळ्यांकडे दुर्लक्ष करुन मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवतात. त्यामुळे अनेक नागरिकांनी या ट्रकचालकांवर कारवाईची मागणी केली आहे. सोबतच यांची मुजोरी खपवून घेणार नसल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे.
इतर महत्वाची बातमी-
-Rain News : विदर्भ, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे ढग कायम, 'या' भागात पावसाची हजेरी