एक्स्प्लोर

Pune News: लाडकी बहीण योजनेचा शुभारंभासाठी पालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना उपस्थितीची सक्ती? महिला अनभिज्ञ, नेमकं काय घडलं?

Ladki Bahin Yojana: आज शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी याठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमासाठी पिंपरी पालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना उपस्थितीची सक्ती केल्याची चर्चा आता सुरू आहे.

Ladki Bahin Yojana: राज्यात सध्या सर्वत्र लाडकी बहिण योजनेची (Ladki Bahin Yojana) चर्चा सुरू आहे. राज्यातील बहिणींना या योजनेच्या माध्यमातून मदत होईल असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे, तर आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी फक्त काही महिन्यांसाठी सुरू केलेली योजना आहे, असं म्हणत विरोधकांनी टीका केली आहे. राज्यातील काही महिलांना या योजनेचा पहिला हप्ता नुकताच खात्यात जमा करण्यात आला आहे. आज या योजनेच्या वितरणाचा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी याठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमासाठी पिंपरी पालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना उपस्थितीची सक्ती केल्याची चर्चा आता सुरू आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) शुभारंभ आज पुण्यातील बालेवाडीत होणार आहे. यात किमान पंधरा हजार महिलांची हजेरी अपेक्षित आहे. हीच गर्दी वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना सक्ती करण्यात आलीये का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण आपण कुठं, कशासाठी आणि का चाललोय? याबाबत या महिला अनभिज्ञ असल्याचं दिसून आलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना गर्दी करण्याचं टार्गेट महायुती सरकारने दिल्याचं बोललं जातं आहे. यातूनच पिंपरी पालिकेने असा उपद्व्याप केल्याची चर्चा रंगलेली आहे.

एबीपी माझाने काही महिलांशी संवाद साधला, यावेळी त्या कुठं चालल्या आहेत या प्रश्नावर त्यांनी बाणेर इतकंच उत्तर दिलं. मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम आहे अशी माहिती काही महिलांनी यावेळी दिली आहे. तर त्यातील काही महिला या आपण कुठं, कशासाठी आणि का चाललोय? याबाबत या महिला अनभिज्ञ असल्याचं दिसून आलं आहे. तर कामाच्या ठिकाणी आम्ही आमचा थंब लावून आलोय असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. 

कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री- दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

आज पुण्यात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुण्यातील बालेवाडीत शुभारंभ करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यासह अन्य नेतेही उपस्थित असणार आहेत.

कार्यक्रमासाठी 15 हजार महिला राहणार उपस्थित

राज्यातील 15 हजाराहून अधिक लाभार्थी महिला कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमामध्ये प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमावेळी लाभार्थींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, महिलांसाठी बैठक व्यवस्था, पार्किंग, महिलांना कार्यक्रमस्थळी आणण्याची व्यवस्था, आरोग्य तपासणी, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे या सर्व गोष्टींची व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेतNCP Muslim Candidate : 10 टक्के जागांवर राष्ट्र्वादी मुस्लिम उमेदवार देणारRamdas Athawale Vidhansabha : 10 ते 12 जागांसह 2 मंत्रिपदाची रामदास आठवलेंची मागणीManish Sisodia Ahmednagar : मनीष सिसोदियांच्या हस्ते कर्जतमधील शाळेचं उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Embed widget