(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
LIVE
Background
Pune News LIVE Updates : पंजाबला अशांत होऊ देऊ नका, आपण इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत मोठी किंमत मोजलीय : शरद पवार काल पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. गेल्या दहा-बारा महिन्यांपासून शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरु आहे तिथं मी स्वतः दोन-तीनवेळा जाऊन आलोय. दुर्दैवाने त्या आंदोलनात सामील झालेल्या घटकाबाबत केंद्र सरकारची भूमिका सामंजस्याची आहे असं मला दिसत नाही. त्या आंदोलनात सहभागी झालेल्यांमध्ये जास्तीत जास्त शेतकरी हे पंजाब, हरियाणा, वेस्टर्न यूपी, राजस्थान इथले आहेत. त्यात ही पंजाबचाच आकडा जास्त दिसतो. त्यामुळं आमचं केंद्र सरकारला सांगणं असतं की, पंजाबचा शेतकरी अस्वस्थ होऊन देऊ नका, असं पवारांनी म्हटलं.
पवारांनी म्हटलंय की, पंजाब हे सीमेवरचं राज्य आहे आणि सीमेवरच्या बहुसंख्य शेतकऱ्यांना आपण अस्वस्थ केलं तर त्याचे दुष्परिणाम होतात. एकदा या देशाने अशांत पंजाबची किंमत दिलेली आहे. अगदी इंदिरा गांधी यांच्या हत्येपर्यंत ही किंमत दिलेली आहे. दुसरीकडे याच पंजाब मधील सर्व शेतकऱ्यांनी अन्न पुरवठ्यासाठी प्रचंड योगदान सतत दिलेलं आहे. या देशाच्या संरक्षणाचा विषय जेंव्हा येतो, तेंव्हा महाराष्ट्रात तुम्ही भाषणं देता. इंच-इंच लढवू म्हणता पण पंजाबच्या सीमेवरील माणूस खऱ्या अर्थाने त्याला तोंड देतो. असा त्याग करणारा घटक काही प्रश्नांसाठी आग्रह धरत असेल, तर त्याकडे राज्यकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. ही राष्ट्रीय गरज आहे, असंही पवार म्हणाले.
Sharad Pawar on Devendra Fadnavis | माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती असे आरोप करू नका : शरद पवार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मतं मांडली. मात्र, यात त्यांनी चुकीचा आरोप केला. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केले. यावेळी केंद्र सरकार कशा पद्धतीने यंत्रणांचा चुकीचा वापर करत आहे, याचा पाढाच पवारांनी वाचून दाखवला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मतं मांडली. त्यात ते म्हणाले उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. पण मी सांगतो की स्वतः सत्ता स्थापन करताना त्यात हस्तक्षेप केला होता. जेव्हा चर्चा सुरू होती की नेतृत्व कोणाकडे द्यायचं. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांचे हात वर केले, त्यांच्या ध्यानीही नव्हतं अन् मनीही नव्हतं. मीच म्हटलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही. स्वतः फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बरंच काही माहिती आहे, अशी माहिती शरद पवार यांनी माध्यमांनी दिली.
वसुलीची चीप अथवा सॉफ्टवेअर त्यांनी दाखवावं. ते मुख्यमंत्री होते, पण त्या पदाला एक मान-सन्मान आहे. मी पण त्या पदावर होतो. मात्र, त्या पदाला फडणवीस धक्का पोहचवत आहेत. मला फडणवीस यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. महाराष्ट्राचा बंगालशी एक घरोबा आहे. त्याला एक मोठा इतिहास आहे. यासाठी शरद पवारांनी बंगाली बोलून दाखवलं हे ऋणानुबंध जुने आहेत. ते आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
काल पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी तयार नव्हते पण मीच त्यांचे हात वर केले, असं म्हटलंय. पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मतं मांडली. त्यात ते म्हणाले उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. पण मी सांगतो की स्वतः सत्ता स्थापन करताना त्यात हस्तक्षेप केला होता. जेव्हा चर्चा सुरू होती की नेतृत्व कोणाकडे द्यायचं. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांचे हात वर केले, त्यांच्या ध्यानीही नव्हतं अन् मनीही नव्हतं. मीच म्हटलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही. स्वतः फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बरंच काही माहिती आहे, अशी माहिती शरद पवार यांनी माध्यमांनी दिली.
फडणवीस यांना हात जोडून विनंती...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मतं मांडली. मात्र, यात त्यांनी चुकीचा आरोप केला. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केले. यावेळी केंद्र सरकार कशा पद्धतीने यंत्रणांचा चुकीचा वापर करत आहे, याचा पाढाच पवारांनी वाचून दाखवला. वसुलीची चीप अथवा सॉफ्टवेअर त्यांनी दाखवावं. ते मुख्यमंत्री होते, पण त्या पदाला एक मान-सन्मान आहे. मी पण त्या पदावर होतो. मात्र, त्या पदाला फडणवीस धक्का पोहचवत आहेत. मला फडणवीस यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. महाराष्ट्राचा बंगालशी एक घरोबा आहे. त्याला एक मोठा इतिहास आहे. यासाठी शरद पवारांनी बंगाली बोलून दाखवलं हे ऋणानुबंध जुने आहेत. ते आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मध्यरात्री पुण्यात मोठी कारवाई; उपाआयुक्तांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं
Pune News : पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल मध्यरात्री पुण्यात मोठी कारवाई करत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपआयुक्त नितीन ढगे यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. नितीन चंद्रकांत ढगे (वय 40) असे पकडण्यात आलेल्या उपआयुक्त यांचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माझं स्वच्छ मत आहे. आज तुम्ही ईडी, सीबीआय, आयटी काहीही वापरा पण हे सरकार पाच वर्षे सत्तेतून हटणार नाही : शरद पवार
माझं स्वच्छ मत आहे. आज तुम्ही ईडी, सीबीआय, आयटी काहीही वापरा पण हे सरकार पाच वर्षे सत्तेतून हटणार नाही : शरद पवार
2017 पासून भाजपने शहरात केलेली अशी दहा विकास कामं दाखवा, ज्यात भाजपने भ्रष्टाचार केलेला नाही. मी हे आव्हान देतो : खासदार अमोल कोल्हे
महापालिका निवडणुका समोर आहेत म्हणून हा मेळावा भरवला गेलाय का? असा प्रश्न विचारला जातोय. पण याचं उत्तर देताना केंद्र सरकारकडे बोट दाखवलं. कृषी कायदे, शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना, महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली तरी काहीही बोलणार नाही, अशी केंद्राची भूमिका आहे. जेव्हा सामान्यांवर अन्याय होत असतो तेव्हा असा ऐंशी वर्षाचा तरुण मैदानात उतरतो.
पेट्रोल डिझेलची दरवाढ का केली? केंद्रीय मंत्री काय म्हणाले तुम्हाला जी लसीकरण मोफत दिली, त्याचा खर्च पेट्रोल-डिझेल दरवाढीतून काढला जातोय. सत्तर साल मे ऐसा कभी हुवा नहीं, काहीतरी जनतेसाठी सरकारने केले आणि त्याचा खर्च असा कर वाढवून वसूल केला.
2017 पासून भाजपने शहरात केलेली अशी दहा विकास कामं दाखवा, ज्यात भाजपने भ्रष्टाचार केलेला नाही. मी हे आव्हान देतो : खासदार अमोल कोल्हे
अभिनेता, निर्माता अमोल घोडके यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार
कोविड -19 महामारीच्या कठीण काळात अनेक लोकांनी कोविड योद्धा म्हणून विविध प्रकारे देशाची सेवा केली आहे. त्यात अनेक डॉक्टर, सफाई कामगार, मानवतावादी, सामाजिक कार्यकर्ते सामील आहेत. अभिनेता, निर्माता अमोल घोडके हे असेच एक योद्धे आहेत. या कठीण काळात ते सर्व गरजू लोकांसाठी अखंडितपणे काम करत होते. अलीकडेच, दिपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टने अशा कोविड योद्ध्यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात कौतुक चिन्ह देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमात अमोल घोडके यांना कोविड योद्धा म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते समाजासाठी त्यांच्या निःस्वार्थ योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूप त्यांना ट्रॉफी, सन्मानपत्र (प्रमाणपत्र) आणि ₹ 50,000/- रक्कम प्रदान करण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अमोल घोडके यांच्या कार्याचे कौतुक करून आणि त्यांना समाजासाठी असेच काम करत राहण्यासाठी प्रेरणा दिली. याप्रसंगी बोलताना राज्यपाल म्हणाले की अमोल घोडके आणि त्याच्यासारख्या लोकांमुळे कोव्हीड काळात असंख्य लोकांसाठी गोष्टी सुलभ झाल्या. यावेळी अभिनेत्री दिपाली सय्यद ह्यांनी देखील अमोलच्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना अमोल घोडके म्हणाले की, “मला मिळालेल्या प्रेम आणि कौतुकाबद्दल मी खरोखरच सर्वांचा खूप आभारी आहे. यापुढे देखील समाजासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी अधिकाधिक समाजोपयोगी काम भविष्यात करण्याचा माझा प्रयत्न असेल तसेच पुरस्कार रूपाने मिळालेले हे 50,000/- रुपये देखील सामाजिक कार्यासाठी वापरणार आहे. या कार्यक्रमात के.ई.एम रुग्णालयाचे डॉ.हेमंत देशमुख, नायर रुग्णालयाचे डॉ.रमेश भारमल, कूपर रुग्णालयाचे डॉ.शैलेश मोहिते, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले तसेच आणखी काही मान्यवरांचा देखील गौरव करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या पिंपरी चिंचवड दौऱ्याचा आज दुसरा दिवस
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या पिंपरी चिंचवड दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज ते शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. पहिल्या दिवशी त्यांनी अनेक लोकार्पण कार्यक्रम पार पाडले. मग पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. तसेच राज्यातील भाजप नेत्यांना देखील सुनावलं. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक पार पाडली, खासकरून यासाठीच पवार साहेब शहरात आले होते. या बैठकीत सुरुवातीला माजी नगरसेवक, मग आजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी पवार साहेबांसमोर सध्य परिस्थिती मांडली. यात पक्षांतर्गत धुसफूस आणि भाजपशी जवळीक साधणाऱ्या पदाधिकाऱ्यांविषयी तक्रारीचा सूर होता. आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असा सावळागोंधळ असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची मरगळ पसरली असणार हे साहेबांच्या लक्षात आलं. म्हणूनच आज ही मरगळ दूर करून त्यांच्यात उत्साह निर्माण करण्यासाठी पवार साहेब कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. भाजप कडून पुन्हा सत्ता काबीज करायची असल्याने ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर राष्ट्रवादी अवलंबून आहे, त्यांच्यात जोश निर्माण करावा लागणार आहे. त्याअनुषंगाने आज ते नेमके कोणत्या मुद्द्यावर भाष्य करतात आणि पालिकेच्या सत्तेत असणाऱ्या भाजपला पायउतार करण्यासाठी कोणता कानमंत्र देतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.