एक्स्प्लोर

Pune news : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, खडकवासला धरणात 70% पाणीसाठा, संध्याकाळी 5 नंतर नदीपात्रात विसर्ग करणार

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरण प्रकल्पात आता पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

Pune news :  पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, (khadakwasla dam) पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरण प्रकल्पात आता पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची तूर्त चिंता मिटली आहे. काल सायंकाळपर्यंत 17.21  टीएमसी एतका पाणीसाठा जमा झालाय. गेल्या काही दिवसांपासून खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणात संततधार पावसाने चांगली हजेरी लावली. सध्या खडकवासला धरण हे 70 % टक्के क्षमतेने भरलंय. धरण क्षेत्रात सततच्या पडत असणाऱ्या पावसामुळे धरण पातळीमध्ये झपाट्याने वाढ होतेय. संध्याकाळी पाच वाजता नदीपात्राच विसर्ग करण्यात येणार आहे. 

खडकवासला धरण आज संध्याकाळपर्यंत 100 टक्के भरले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. खडकवासला धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून 1000 क्युसेकने सुरू होईल. नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि तेथे ठेवलेले प्राण्याचीदेखील काळजी घ्या. सखल भागातील लोकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असं प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आलं आहे. 

पुणे जिल्ह्यातील घाट विभागात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, ताम्हिणी घाट परिसरात गेल्या 24 तासात 230 मिमी पाऊस झाला, तर लोणावळ्यामध्ये 136 मिमी आणि शिरगावमध्ये 175 मिमी पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यासाठी 27 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 25 जुलै रोजी 'घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता' वर्तवण्यात आली आहे.

पुढील काही दिवस पुण्यातील वातावरण कसं असेल?

25 जुलै : आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

26 जुलै : आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी / संध्याकाळी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

27 जुलै : आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी / संध्याकाळी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

28 जुलै : आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे

29 जुलै : आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Vs Sanjay Shirsat : Eknath Shinde यांच्या बॅगेत नेमकं काय? राऊत - शिरसाटांमध्ये खडाजंगी!Shrirang Barne on Maval Lok Sabha Elections : मावळमध्ये फेर मतदान होणार?श्रीरंग बारणेंची मोठी मागणी!Ghatkopar Hoarding Video : मुंबई होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, अजूनही 30 जण अडकल्याची भीती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
Embed widget