(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : विसर्जन मिरवणुकीतील डीजे अन् लेझरवर टीका; साऊंड सिस्टीम व्यावसायिक काय म्हणाले?
सध्याच्या काळात ज्या साऊंड सिस्टीम लागतात त्यावर निर्बंध यायला पाहिजेत. स्पीकर घातक आहेत त्यावर निर्बंध आणायला हवेत, त्यासाठी आम्ही पोलिसांकडे पाठपुरावा करत असल्याचं डीजे धारकांनी म्हटलं आहे.
पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणुकांच्या आवाजावरुन (Pune) अनेकांनी टीका केली. डीजेवर बंदी घाला अशी मागणी केली त्यावर आता साऊंड अँड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याच्या काळात ज्या साऊंड सिस्टीम लागतात आणि कर्कश आवाज होतो त्यावर निर्बंध यायला पाहिजेत. स्पीकर घातक आहेत त्यावर निर्बंध आणायला हवेत, त्यासाठी आम्ही पोलिसांकडे पाठपुरावा करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले की, सध्याच्या काळात ज्या साऊंड सिस्टीम लागतात आणि करकर्ष आवाज होतो त्यावर निर्बंध यायला पाहिजेत. जे ड्रायव्हर, स्पीकर घातक आहेत त्यावर निर्बंध आणायला हवेत. प्रेशर मिड नावाचे कंपोनंट स्पीकर बॉक्समध्ये टाकले जातात. त्यामुळे इतका करकर्श आवाज होतो. गणेशोत्सवात हे गेल्या 4-5 वर्षांपासून वापरले गेलेत. एका बॉक्स मध्ये 4-5 प्रेशर मिड वापरले जातात. आम्ही अनेकदा पोलिसांना, मंडळांना निवेदन दिले आहे.
याच काळात वापरण्यात येणाऱ्या लेझरवर देखील त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या मार्केटमध्ये लेझर उपलब्ध आहे ज्याने देखील त्रास होतो. या गोष्टींवर निर्बंध यायला हवेत असे आमचे प्रयत्न आहेत. काही व्यावसायिकांनी हे होऊ दिले मात्र सगळ्या व्यावसायिकांना एकच तराजूत तोललं गेलं नाही पाहिजे, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
'व्यावसायात नवीन आलेल्यांची चूक'
7-8 वर्षात मार्केट नवीन स्पीकर आली की स्पर्धा होते. मागणी वाढते. त्यामुळे काहीजण व्यवसायानुसार बदल करत गेले. आवाजाचा दुष्परिणाम मानवी शरीरावर होऊ नये अशी अपेक्षा असते. सध्या माझा आवाज अधिक असावा अशी मागणी वाढली. एका बॉक्स मध्ये 4-5 प्रेशर मिड वापरले जातात. आमच्या व्यावसायात नवीन आलेले लोक एकाच बॉक्स मध्ये 8 ते 10 प्रेशर मिड वापरतात. काहीजण तर 20 ते 24 वापरतात, त्यामुळे अनेकांना त्रास होण्याची शक्यता जास्त आहे, असंही साऊंड अँड इल्क्ट्रीकल्स जनरेटर्स असोसिएशनचं म्हणणं आहे.
'लेझरवर देखील बंदी आणा'
लेझर अगोदर मिली वॅट मध्ये यायचे. आता 20 ते 25 वॅटचे आले आहेत. ते धोकादायक आहेत. मुळात त्याचा झोत आकाशात किंवा भिंतीवर सोडला जातो. मात्र तो मिरवणुकींमध्ये नागरिकांवर सोडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एकाची दृष्टी अधु झाली. या लेझरवर देखील बंदी आणावी अशी आमची मागणी आहे, असंही ते म्हणाले.
इतर महत्वाची बातमी-