Pune Hording : मुंबई होर्डिग्सस दुर्घटनेचा धसका; पुण्यात अनधिकृत होर्डिग्स काढायला सुरुवात, सात दिवसात काढून टाकण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश
पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी अनधिकृत होर्डिंग्ज पुढील 7 दिवसात काढून टाकण्याचे आदर्श दिले आहेत. जे कारवाई करणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील असा सज्जड दम सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना दिलाय.
पुणे : मुंबईतील घाटकोपर येथे वादळी पावसात होर्डिंग पडून आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिका खडबडून (Pune Hordings) जागी झालीय. पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी अनधिकृत होर्डिंग्ज पुढील 7 दिवसात काढून टाकण्याचे आदर्श दिले आहेत. जे कारवाई करणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील असा सज्जड दम सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना दिलाय. महापालिका आयुक्त यांनी स्वतः पुण्यातील रस्त्यावर फिरून या होर्डिंग्जचा आढावा घेतला. पुण्यात जवळपास 2598 होर्डिंग्ज आहेत त्यापैकी अनेक हे नियमबाह्य आहेत त्यामुळे यावर तात्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र काही होर्डिंग उतरवत असताना कामगारांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
पुण्यात अनधिकृत होर्डिंग्स काढायला सुरुवात झाली आहे. पुण्यातील खंडोजी बाबा चौकातील होर्डिंग्स काढायला सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसात शहराती अनेक ठिकाणी असलेली होर्डिंग्स काढण्यात येणार आहे. पुण्यातील जाहिरात होर्डिंग्ज बाबत जिल्हाधिकारी यांनी अहवाल मागितला आहे. पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागात लावण्यात आलेल्या होर्डिंग्सचा अहवालही मागवण्यात आला आहे. परवानगी देण्यात आलेल्या सर्व जाहिरात पालकांचे स्थापत्य विषयक लेखापरीक्षण नव्याने करून घेण्यास संबंधित जाहिरात फलक धारकाला कळवावे असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
2500 परवानग्या आहेत. मात्र तेवढेत अनधिकृतदेखील आहेत. याची सगळी चौकशी करणं सुरु आहे. अनधिकृत असेल तर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 2598 अधिकृत होर्डिंग्स आहे. शहरात फक्त 85 अनधिकृत होर्डिंग्स आहेत. त्यात हडपसरमध्ये सगळ्यात जास्त अनधिकृत होर्डिंग्स आहेत. 2300 होर्डिंगसचं ऑडिट झालं आहे. त्यातील आतापर्यंत एकूण 1564 अनधिकृत होर्डिंग्सवर पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. येत्या काळात होर्डिंग्सवर कारवाई करण्यात येणार आहेत. ऑडिट करण्यासाठी पुणे महापालिकेने कंबर कसली आहे.
अवकाळी पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुण्यात अनेकदा होर्डिंग्स पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात अनेक जणांचा जीवदेखील गेला आहे. मात्र काही काळापूर्ती या सगळ्या होर्डिंग्सवर कारवाई केली जाते. त्यानंतर कारवाई थंड होते. अजून अशा काही घटना घडल्या की पुन्हा कारवाईचा फास उगारला जातो. आता मुंबईची घटना झाल्याने पुन्हा एकदा महापालिकेला जाग आली आहे. त्यांनी थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
इतर महत्वाची बातमी-
बंगळुरूत 'यलो अलर्ट'; संपूर्ण आठवडाभर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईतील परिस्थिती काय?