एक्स्प्लोर

Mumbai Children Hostage: गेल्या सहा दिवसांपासून वेब सिरीजसाठी कास्टिंग, शेवटच्या दिवशी ओलिसनाट्य! लंचसाठी मुल बाहेर आली नाहीत अन् मुलांचा हात काचेतून दिसताच थरकाप उडाला

Mumbai Children Hostage: रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान एक ज्येष्ठ महिला आणि लहान मुलगी जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Mumbai Children Hostage: मुंबईतील पवईमध्ये वेब सिरीजच्या कास्टिंगसाठी आलेल्या मुलांना ओलिस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. पवई पोलिसांनी सर्वांची सूखरुप सुटका केल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. ओलिस ठेवणाऱ्याचे रोहित आर्य नाव असून त्याने मुलांना आरए स्टुडिओमध्ये नेत ओलिस ठेवलं होतं. पवई पोलिसांनी मुलांना सुरक्षितपणे वाचवले. सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान एक ज्येष्ठ महिला आणि लहान मुलगी जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस हवालदार शिवाजी सावंत यांनी महिलेला सुखरूप वाचवलं. पोलिसांनी 17 मुलांसह 19 जणांची सुखरुप सुटका केली. 

मुलं नेमकी कशी पोहोचली? (Mumbai Children Hostage) 

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत काम करण्यासाठी मुंबईत ऑडिशन असल्याची माहिती देण्यात आली होती. शाळेमधून मुलांना ऑडिशन देण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आली होती. कोल्हापूरमधून सुद्धा मुलं ऑडिशन देण्यासाठी आली होती. या सर्व मुलांची रोहित आर्याने सकाळी ऑडिशन घेतली. यानंतर लहान मुलांना खुश करण्यासाठी रोहित आर्याने पिझ्झा आणि कोल्ड्रिंकसोबत इतर खाण्याच्या वस्तू मागवल्या. ऑडिशन झाल्यानंतर त्याने सर्व मुलांना बंधक बनवण्यास सुरुवात केली. लहान मुलांच्या डोक्यावर बंदूक ठेवून कोणी बोलू नका, नाही तर गोळी मारेन अशी धमकी आरोपी रोहित आर्या देत राहिला. 

पालकांना केव्हा शंका आली? 

लंच टाईममध्ये मुलं स्टुडिओतून बाहेर न आल्याने पालक चिंतेत पडले. मुलांनी काचेतून हात दाखवल्यानंतर पोलिस आले आणि हे अपहरणाचे प्रकरण असल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेत नेमकं काय घडलं? (Mumbai Children Hostage) 

  • मुलांना आमिष दाखवून बंदी बनवण्यात आले.
  • ही घटना पवई परिसरातील आरए स्टुडिओमध्ये घडली.
  • मुले मुंबईसह विविध ठिकाणांहून आली होती.
  • पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
  • आरोपीने एक व्हिडिओ संदेश जारी केला.
  • सर्व मुलांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले.
  • पोलिस बाथरूममधून खोलीत घुसले.
  • खोलीत एअरगन आणि केमिकल देखील आढळलं.

आरोपीने एक व्हिडिओ जारी केला

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की त्यांनी आरोपीला यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी पोहोचली. मुलांना ओलीस ठेवल्यानंतर आरोपीने एक व्हिडिओ देखील जारी केला. त्यात तो म्हणाला की, "मी रोहित आर्य आहे. आत्महत्या करण्याऐवजी, मी एक योजना आखली आणि काही मुलांना ओलीस ठेवले. माझ्या फारशा मागण्या नाहीत. माझ्या काही साध्या मागण्या आहेत. माझे काही प्रश्न आहेत. मी दहशतवादी नाही आणि मी मोठ्या रकमेची मागणी करत नाही. मी या मुलांना साध्या संभाषणासाठी ओलीस ठेवले आहे." व्हिडिओ संदेशात, आरोपी पुढे म्हणतो, "मी एकटा नाही. माझ्यासोबत अनेक लोक आहेत. मी बोलून तोडगा काढेन."

आरोपी एकटा होता, पोलिसांनी दिली माहिती

पोलिसांनी सांगितले की दुपारी 1:45 वाजता मुलांना ओलिस ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला एका बाजूने बोलण्यात गुंतवून दुसऱ्या बाजूने बाथरुममधून पोलिसांनी आत एन्ट्री करत ओलिस ठेवलेल्या मुलांची सुटका केली. यावेळी घटनास्थळी एअरगन आणि केमिकल दिसून आले. आरोपी एकटाच होता. आम्ही कारण शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपी त्याच्या मागण्यांवर ठाम राहिला.  

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Embed widget