एक्स्प्लोर
नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन देण्यासाठी पुण्यात मोर्चा
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन देण्यासाठी पुण्यामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार संजय काकडे यांनी या मोर्चाचं आयोजन केलं होतं.
डेक्कनच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या मोर्चाला सुरुवात झाली. महिला आणि मुलींनी या मोर्चाला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करुन भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. त्या निमित्तानं त्यांना पाठिंबा म्हणून हा मोर्चा आयोजित केला असून त्याचा कुठल्याही शक्तीप्रदर्शनाशी संबंध नाही, असं खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांना त्रास होत आहे, नोटाबंदीच्या समर्थनासाठी निघणाऱ्या मोर्चांना परवानगी देतात, मात्र त्याचा निषेध करण्यासाठी निघणाऱ्या मोर्चाला परवानगी देत नाही, अशी टीकाही अजित पवारांनी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement