एक्स्प्लोर
पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची गोची, चार वर्षांची कुंडली जनतेसमोर
पुणेः महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना नगरसेवकांची चांगलीच गोची झाली आहे. पुण्यातील एका संस्थेने नगरसेवकांची चार वर्षांची कुंडलीच जनतेसमोर मांडली आहे. यामध्ये नगरसेवकांनी चार वर्षात बाकडी बसवण्यासाठीच जास्त निधी खर्च केला, असं समोर आलं आहे. नगरसेवकांना या प्रगती पुस्तकाला सामोरं जाण्याचं कठीण आव्हान समोर उभं राहिलं आहे.
पुणे महापालिकेत एकूण 152 नगरसेवक आहेत. नगरसेवकांनी मागच्या चार वर्षात काय केलं असा प्रश्न सर्वांना पडला असेल. याचं उत्तर आता पुण्यातील परिवर्तन संस्थेने काढलेल्या प्रगतीपुस्तकातून मिळणार आहे. परिवर्तन संस्थेने नुकतंच 152 नगरसेवकांच्या चार वर्षांच्या कामाचा आढावा घेणारं प्रगतीपुस्तक काढलं आहे.
सर्वाधिक खर्च कशावर?
2012 मधील प्रगती पुस्तकात समोर आलेल्या आकडेवारीनुसार तब्बल 13 कोटी रूपये बाकड्यांवर खर्च झाले आहेत. त्याला चार वर्ष लोटत नाहीत, तोवर पुन्हा 11 कोटींची बाकडी रस्त्यावर बसवली असल्याचं कागदोपत्रीतरी समोर आलं आहे. त्यामुळं नगरसेवकांनी केवळ बाकडं बसवण्यालाच का प्राधान्य दिलं असावं, पुण्यात दुसरे काहीच प्रश्न नाहीत का, असा यक्ष प्रश्न पुणेकरांसमोर उभा राहिला आहे.
प्रगतीपुस्तकातील ठळक बाबी
- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मागच्या चार वर्षात एकही प्रश्न विचारले नाही असे तब्बल 85 नगरसेवक आहेत. हीच संख्या 2012 मध्ये 45 होती.
- सभागृहात उपस्थित राहणाऱ्यांची संख्या काहीशी वाढली असली तरी नगरसेवकांकडून प्रश्नांची संख्याच कमी झाली आहे.
- 152 पैकी 61 नगरसेवकांवर विविध गुन्हे दाखल आहेत.
- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सर्वात कमी उपस्थिती असलेले नगरसेवक आहेत काँग्रेसच्या शशिकला आरडे आणि सतीश लोंढे.
- सर्वाधिक उपस्थिती लावणारे नगरसेविका भाजपच्या माधुरी सहस्रबुद्धे आणि शिवसेनेचे अशोक हरणावळ हे आहेत.
- बाकडी बसवण्यावरच तब्बल 11 कोटी रूपये खर्च झाले आहेत.
- ड्रेनेज लाईनवर साडेआठ कोटी रूपये खर्च झाले आहेत.
- क्राँक्रिटीकरणावर 6 कोटी रुपये
- पथदिव्यांच्या कामासाठी साडेपाच कोटी रूपये
- दिशादर्शक फलकांसाठी साडेचार कोटी रूपये
- 152 नगरसेवकांनी मिळून चार वर्षात 60 कोटींचा निधी वापरला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement