Pune-Indapur News: सावकाराच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत संपवलं आयुष्य; इंदापूरातील धक्कादायक घटना
इंदापूर तालुक्यातील (Indapur) भरणेवाडी येथील 32 वर्षीय व्यक्तीने सावकारांच्या त्रासाला कंटाळून (Suicide) आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जावेद अब्बास मुलाणी असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
Pune-Indapur News: इंदापूर तालुक्यातील (Indapur) भरणेवाडी येथील 32 वर्षीय व्यक्तीने सावकारांच्या त्रासाला कंटाळून (Suicide) आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जावेद अब्बास मुलाणी असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. जावेदला व्याजाच्या पैशांसाठी तीन सावकारांनी सातत्याने तगादा लावून मानसिक त्रास दिल्याने आत्महत्या केल्याचं जावेदने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. जावेद हा इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी गावाचा रहिवासी होता. भरनेवाडी हे गाव माजी राज्यमंत्री आणि इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांचं आहे. त्याच्याच गावातील युवकाने सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रफुल्ल रघुनाथ देवकाते, विजय मोटे, संदिप अरुण भोसले या तिघांवर पोलिसांनी व्याजाच्या पैशासाठी तगादा लावून आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी महाराष्ट्र सावकारी अधिनियमानूसार गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्त्येपूर्वी मुलाणी यांनी चिठ्ठी लिहून खिश्यात ठेवली होती. यातील 2 सावकार हे बारामती तालुक्यातील तर एक सावकार इंदापूर तालुक्यातील आहे.
काही दिवसांपूर्वी जावेद आब्बास मुलाणी यांनी खासगी सावकरांकडून व्याजाने पैसे घेतले होते. सावकारांनी व्याजाच्या पैशासाठी जावेदकडे तगादा लावत होते. खाजगी सावकार जावेद यांना वारंवार जीवे मारण्याची धमकी देत होते. त्यामुळे या सावकारांच्या त्रासाला कंटाळून जावेद मुलाणी यांनी मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जंक्शन ते कळस रसत्यानजीक असलेल्या पत्र्याचे शेडमधील लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्त्या केली.
या प्रकरणी नवाज अब्बास मुलाणी यांनी या खाजगी सावकाराविरोधात वालचंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून वालाचंद नगर पोलीस ठाण्यात कलम 306,506,34 आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39,45 गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास वालचंदनगर पोलीस करीत आहेत. इंदापूरात गुन्ह्यांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यात चोरी, लैंगिक अत्याचार, हत्या यांचं प्रमाण जास्त आहे. सातत्याने वाढत असलेल्या गुन्ह्यांमुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.