एक्स्प्लोर

पुण्यात पावसाचे चार बळी; अंडा भुर्जीच्या स्टॉलवरील तिघांना शॉक, तर भोजनालयावर दरड कोसळून एकाचा मृत्यू

डेक्कन भागात तीन जणांचा हातगाडी हलविण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ज्या हातगडीवर धंदा करायचे त्या हातगडीला पुराच्या पाण्यात वाचवताना ही दुर्दैवी घटना घडली आ

पुणे :  पुण्यात  (Pune Rain Update)  रात्रभर मुसळधार पाऊस आणि त्याचवेळी खडकवासला धरणातून (Khadkwasla Dam)   झालेला 40 हजार क्युसेकचा विसर्ग यामुळे पुण्यात भयानक पूरस्थिती उद्भवली आहे. पुण्यात अनेक भागात पाणी शिरलंय. पुण्याच्या निंबजनगर, एकता नगर भागात जवळपास 4 ते साडेचार फूट पाणी साचलंय. त्यामुळे गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. शेकडो लोक इमारतींमध्ये अडकले आहेत. पुण्यात बचावकार्यात रस्त्यावर बोटी चालवण्याची वेळ आलीय.सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यात अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झालाय. तर   मुसळधार पावसात चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

राज्यात  मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर मुसळधार पावसाने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. पुण्याला  मोठ्या प्रमाणात पुराचा तडाखा बसला असून  विजेचा धक्का लागल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे.  पुण्यातील भिडे पुलाजवळील घटना घडली आहे. अंडा भुर्जीचा स्टॉल सुरक्षित ठिकाणी नेत असताना विजेचा धक्का लागून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.   डेक्कन भागात तीन जणांचा हातगाडी हलविण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ज्या हातगडीवर धंदा करायचे त्या हातगडीला पुराच्या पाण्यात वाचवताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. 

भोजनालयावर दरड कोसळून एकाचा मृत्यू

 तर ताम्हिणी घाट विभागात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झालास असे  मुळशी तहसीलमध्ये, जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले. पौड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले की, मुळशी तहसीलमधील ताम्हिणी घाटात एका छोट्या भोजनालयावर दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे.जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलिस रस्त्यावरील ढिगारा हटविण्याचे काम करत असून, ते हटवल्यानंतर रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाणाप आहे  लवासा परिसरातील एका बंगल्यात तीन जण चिखलात अडकल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पुणे जिल्ह्यासाठी पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट

खेड, जुन्नर, आंबेगाव, वेल्हा, मुळशी, मावळ, भोर, हवेली तालुके आणि पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहर परिसरातील 'घाट' (डोंगरातील खिंडी) विभागातील अतिवृष्टीचा विचार करून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.  सावधगिरीचा उपाय म्हणून, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या टीम सखल भागात तैनात करण्यात आल्या आहेतय  जेथे पूर आणि पूर येण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडण्याचे आवाहन दिवसे यांनी केले. आयएमडीने पुणे जिल्ह्यासाठी पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट दिला आहे. विनाकरण घराबाहेर पडू नका, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
Aurangzeb Tomb Row: शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच्या लोकांना कबर का हटवायचेय? खुलताबादच्या फुलविक्रेत्याचा प्रश्न
शिवरायांच्या वंशजांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच कबर का हटवायचेय? फुलविक्रेत्याचा प्रश्न
Ajit Pawar : त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 AM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 17 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
Aurangzeb Tomb Row: शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच्या लोकांना कबर का हटवायचेय? खुलताबादच्या फुलविक्रेत्याचा प्रश्न
शिवरायांच्या वंशजांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच कबर का हटवायचेय? फुलविक्रेत्याचा प्रश्न
Ajit Pawar : त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
Narayan Rane on Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस, काँग्रेस बुडवण्यासाठी त्यांची नेमणूक; नारायण राणेंचा सडकून प्रहार
हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस, काँग्रेस बुडवण्यासाठी त्यांची नेमणूक; नारायण राणेंचा सडकून प्रहार
Video : बलूच बंडखोर थांबता थांबेनात; रेल्वे हायजॅकनंतर आता पाकिस्तानी सैन्यावरील आत्मघाती हल्ल्याचा सुद्धा बाॅलिवूड स्टाईलने व्हिडिओ रिलीज
Video : बलूच बंडखोर थांबता थांबेनात; रेल्वे हायजॅकनंतर आता पाकिस्तानी सैन्यावरील आत्मघाती हल्ल्याचा सुद्धा बाॅलिवूड स्टाईलने व्हिडिओ रिलीज
Ajit Pawar on Ladki Bahin : लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार, मात्र योजना बंद करणार नाही : अजित पवार
लाडकी बहीण योजनेतून नावं कमी झाली, त्यांना दिलेल्या पैशांबाबत अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले...
IPL 2025 : आयपीएल मोफत पाहण्याची संधी, 'या' कंपनीनं आणली शानदार ऑफर, फक्त एक काम करावं लागणार
IPL 2025 मोफत पाहण्याची संधी, फक्त एक काम करावं लागेल, 'या' कंपनीची भन्नाट ऑफर
Embed widget