एक्स्प्लोर

Pune Ganeshotsav 2023 : गणपती मूर्ती विक्रीतून वृद्धाश्रमातील आजीआजोबांची सेवा; पिंपरी-चिंचवडच्या 'या' उपक्रमाची जोरदार चर्चा

पिंपरी-चिंचवडच्या श्री शंकर महाराज सेवा मंडळतर्फे ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ या उपक्रमाअंतर्गत वयस्करांसाठी निशुल्क वृद्धाश्रम चालवलं जातं. या मूर्ती विक्रीतून मिळालेला निधी हा वृद्धाश्रमासाठी वापरला जातो.  

पुणे : पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि कोट्यावधी (ganeshotsav 2023)  रुपयांचा खर्च करुन साजरा केला जातो. मात्र याच गणेशोत्सवातून अनेकांना रोजगार मिळतो तर अनेकजण सामाजिक कार्य करतानादेखील दिसतात. पिंपरी-चिंचवडच्या श्री शंकर महाराज सेवा मंडळतर्फे ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ या उपक्रमाअंतर्गत वयस्करांसाठी निशुल्क वृद्धाश्रम चालवलं जातं. या मूर्ती विक्रीतून मिळालेला निधी हा वृद्धाश्रमासाठी वापरला जातो.  

श्री शंकर महाराज सेवा मंडळ, चिंचवड ही धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत संस्था आहे. रक्तदान शिबिरांपासून संस्थेची सुरुवात झाली आहे. गेल्या 30 वर्षांपासून वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम संस्थेद्वारे राबविले जातात आणि त्यापैकीच एक महत्वपूर्ण प्रकल्प म्हणजे संस्थेकडून किवळे येथे ‘स्नेहसवली – आपलं घर’ हे निशुल्क वृद्धाश्रम चालवलं जातं.  संस्था 25 निराधार आजीआजोबांचा सांभाळ करत आहे. त्यांचा निवास, भोजन, कपडे, इतर संबंधी गरजा तसेच महत्वाचे म्हणजे आवश्यक मोफत वैद्यकीय सेवेची जबाबदारी संस्था घेत आहे.

सांभाळ करत असणाऱ्या वृद्धांचे वयोमानानुसार अंगी लागणारे आजार, वैद्यकीय तपास आणि गरजेप्रमाणे बायपास सर्जरी, कॅटरॅक्ट ऑपरेशन, हिप रिपलेसमेंट सारखे अवघड आणि खर्चिक शस्त्रक्रियेची जबाबदारी देखील निशुल्क उचलली जाते. हा सर्व डोलारा चलविण्यासाठी येणारा खर्च हा साधारण दोन लाख रुपये प्रति महिना आहे आणि तो उभा करण्यासाठी संस्था अनेक उपक्रम राबवते आणि त्यातून मिळणारे दान आणि होणारी आर्थिक मदतीतून वृद्धाश्रमाचा सर्व खर्च भागवला जातो. 

रद्दी आणि भंगार गोळाकरुन मिळालेल्या पैशातून वृद्धाश्रमाचा खर्च

या मध्ये संस्थेकडून रद्दी आणि भंगार गोळा करण्याचा उपक्रम राबविला जातो ज्या अंतर्गत संस्थेद्वारे घरोघरची रद्दी आणि भंगार गोळा करून निधी निर्माण केला जातो आणि याकरता साधारण सतरा हजार कुटुंब दानस्वरूपी मदत संस्थेला वर्षभर करतात. याबरोबरीने संस्थेकडून अभिनव संकल्पनेने दरवर्षी नियमितपणे ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ हा उपयुक्त प्रकल्प राबविला जातो.

अनेक वृद्धांना हातभार

दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक या उपक्रमात सहभागी होत असतात. अनेक लोक वृद्धांची सेवा आणि आशीर्वाद मिळतो आणि वृद्धाश्रमाला हातभार लावता येतो, या भावनेने या उपक्रमात सहभागी होत असतात आणि या उपक्रमातून अनेक वृद्धांना हातभार लावत असतात. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Ganeshotsav News : पुण्यातील गणेशोत्सवात रंगणार राजकीय आखाडा, देखाव्यासाठी मोदी, फडणवीस अन् अनेक नेत्यांच्या हुबेहुब प्रतिकृती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravichandran Ashwin : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Video : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Vijay Mallya : विजय माल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना 14000 कोटी दिले, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
विजय  माल्ल्याला दणका, संपत्ती विकून बँकांची थकबाकी भरली, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
Santosh Deshmukh Beed Death: मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare PC FULL : जनतेनं संजय राऊतांना त्यांची जागा दाखवली - सुनील तटकरेAjit Pawar Nagpur : दोन दिवसांनंतर अजित पवार आज सभागृहात जाणारAmol Mitkari Nagpur : अजित पवार आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?Suresh Dhas Meet Ajit Pawar:त्या 6-7 जणांचा आका कोण आहे? त्या आकांचा आका कोण?धस यांचा निशाणा कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravichandran Ashwin : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Video : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Vijay Mallya : विजय माल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना 14000 कोटी दिले, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
विजय  माल्ल्याला दणका, संपत्ती विकून बँकांची थकबाकी भरली, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
Santosh Deshmukh Beed Death: मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
Suhas Kande: छगन भुजबळांनी कितीही ढोंग केले तरी त्यांच्यात राष्ट्रवादी पक्ष सोडण्याची हिंमत नाही: सुहास कांदे
ढोंगी, गद्दार, ओरिजनल भुजबळ असाल तर..., सुहास कांदे छगन भुजबळांना काय काय म्हणाले?
Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
Embed widget