एक्स्प्लोर

Pune Fire News : घरात झोपलो होतो, बाहेरुन आवाज आला अन् बघतो तर...; टिंबर मार्केटला लागलेल्या आगीत 8 संसार उद्ध्वस्त

पुण्याच्या टिंबर मार्केट गोडाऊनला मोठी आग लागली होती. या आगीत नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांचे संसार उद्धस्त झाले आहेत तर जवळच्या शाळेतील बाक आणि मुख्यध्यापकांच्या खोलीतील सामान जळून खाक झाले आहे.

Pune Fire News : पुण्याच्या टिंबर मार्केट गोडाऊनला मोठी आग लागली होती. या आगीत नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांचे संसार उद्धस्त झाले आहेत तर जवळच्या शाळेतील बाकं आणि मुख्यध्यापकांच्या खोलीतील सामान जळून खाक झाले आहे. पहाटे साधारण चारच्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांची आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल पाच तास लागले.

डोळ्यादेखत 8 कुटुंबाचे संसार उद्धवस्त

टिंबर मार्केटचा हा परिसर मोठा आहे. शेजारी लोकवस्तीदेखील आहे. या आगीमुळे शेजारी असलेल्या लोकवस्तीत खळबळ उडाली होती. साखर झोपेत असलेले नागरीक आगीचे लोट पाहून आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांचा आवाज ऐकून जागे झाले. या आगील सुमारे आठ घरांचं मोठं नुकसान झालं आहे. डोळ्यादेखत 8 कुटुंबियांचा अख्खा संसार उद्वस्त झाला आहे. घरातील सगळं सामान जळून खाक झालं आहे. जवळच असलेल्या एका चार मजली इमारतीमधील (मातृछाया ) खिडकीच्या काचा आगीच्या तीव्रतेने फुटल्या व खिडकीचे कापडी पडदे, टेरेसवर असणारे  पत्र्याचे शेडदेखील जळून खाक झाले आहेत. पुण्यातील लाकडी सामानाची मोठी बाजारपेठ असलेल्या टिंबर मार्केटमध्य़े आग लागल्याने किरकोळ विक्रेत्यांचंदेखील नुकसान झालं आहे.

'पाच मोठी गोडाऊन आहेत. डोळ्यादेखत सगळं खाक होताना बघितलं. सुमार पाच तास आग आटोक्यात येत नव्हती. आमच्यातील अनेकांच्या घरात नुसता धूर दिसत आहे. मागील अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या 8 कुटुंबाच्या दाणादाण झाला आहे. घरातील सगळं सामान विखुरलेल्या अवस्थेत आहे. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात. 

'या गोडाऊनच्या शेजारीच आमचं घर आहे. आमचा मुलगा पहिल्याच खोलीच झोपला होता. त्याचवेळी संपूर्ण आग घरात आली. मुलगा सुदैवाने बचावला मात्र घरातील एकही सामान व्यवस्थित नाही. आम्ही सगळे घरात झोपलो होतो. बाहेरुन अनेकांचा आवाज आला आणि आम्ही खडबडून जागं झालो. बघितलं तर अर्ध घर जळालं होतं', असं नागरिक सांगतात. 

अग्निशमन दलाच्या जवानांचं प्रसंगावधान...

पुण्यातील टिंबर मार्केटमधील गोडाऊनला भीषण आग लागली . आग लागल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. आग खूपच भीषण असल्यामुळे शेजारील 4 घरंही आगीच्या भक्ष्यस्थानी आली पण अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. यात सुदैवाने कोणाही दगावला नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सShashikant Shinde meet Ajit Pawar : नागपुरातील निवासस्थानी शशिकांत शिंदे-अजित पवार भेटTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
IPO : MobiKwik, विशाल मेगा मार्ट, साई लाइफ सायन्सेसचे आयपीओ लिस्ट होणार, गुंतवणूकदार मालामाल होणार,GMP कितीवर? 
शेअर बाजारात 3 मेनबोर्ड आयपीओचं लिस्टिंग, गुंतवणूकदार मालामाल होणार, GMP कितीवर?
EPFO :पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, व्याजदराबाबत नवी अपडेट, ईपीएफओ मोठ्या निर्णयाच्या तयारीत 
मोठी बातमी, पीएफ खातेदारांना दिलासा मिळणार, व्याजदराबाबत मोठी अपडेट, ईपीएफओची विशेष रणनीती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Embed widget