एक्स्प्लोर

Pune Fire News : आग लागली, महिला पळत निघाली पण तिथेच अडकली, अग्निशमन दलाचा जवान थेट इमारतीत शिरला अन्...

पुण्यातील एका माहिलेसाठी अग्निशमन दलाचे जवान देवदूत ठरले आहेत. धनकवडी परिसरात इमारतीला लागलेल्या आगीत अडकलेल्या महिलेची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली आहे. त्यामुळे महिलेचा जीव वाचला आहे. 

Pune News: पुणे : अग्निशमन दलाच्या जवान (Pune Fire) सामान्य नागरिकांसाठी कायम देवदूत ठरत असतात. आतापर्यंत अनेकांचा जीव या जवानांनी वाचवल्याचं आपण पाहिलं आहे. दरम्यान पुन्हा एकदा पुण्यातील एका माहिलेसाठी अग्निशमन दलाचे जवान देवदूत ठरले आहेत. धनकवडी परिसरात इमारतीला लागलेल्या आगीत अडकलेल्या महिलेची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली आहे. त्यामुळे महिलेचा जीव वाचला आहे. 

धनकवडीतील पहिल्या मजल्यावर एका इमारतीला आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. त्याचवेळी तिथेच एका खोलीत एक महिला धुरामुळे अडकली असल्याने जवानांनी तातडीने बीए सेट परिधान करत खोलीत प्रवेश करुन महिलेला सुखरुप बाहेर काढले तर इतर जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करत सुमारे पंधरा मिनिटात आग पूर्ण विझवली. आग कशामळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नसून आगीमधे सदनिकेचे मोठे नुकसान झाले असून गृहपयोगी वस्तू जळाल्या आहेत. 

महिलेचा जीव वाचवल्यामुळे इमारतीतील नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले. आग लागताच बराच गोंधळ निर्माण झाला होता. सगळे नागरिक सैरावैरा पळत इमारत खाली करत होते. त्याच वेळी ही महिला अडकली होती. पुण्यात आगीच्या घटना वाढत आहे. अनधिकृत बांधकाम, शॉर्ट सर्किट ही आगीची कारणं समोर आली आहे. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी कायमच उत्तम कामगिरी

पुण्यातील अग्निशमन दलाच्या जवानांनी कायमच उत्तम कामगिरी बजावली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील अग्निशमन दलातील जवान हर्षद येवले यांनी देखील कुटुंबीयांना जत्रेला घेऊन जात असताना रस्त्यावर पेट घेत असलेली गाडी पाहिली आणि जीवाची तमा न बाळगता कुटुंबीयांना सोबत घेत गाडीची आग विझवली होती. त्यांनी कुटुंबीय सोबत असताना आणि महत्त्वाचं म्हणजे सुट्टीवर असताना केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक झालं होतं. पुण्यातील उंड्री परिसरात रात्री एका चालत्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला. त्यावेळी ऑफ-ड्युटी असलेला अग्निशमन दलाचा जवान मदतीसाठी आला. पेटलेली गाडी पाहून त्यांनी तत्परतेने आगीच्या दिशेने धाव घेत गाडीत कोणी अडकले आहे का याची प्रथम पाहणी केली. मग धर्मावत पेट्रोल पंप येथील अग्निरोधक उपकरण वापरुन बीएमडब्ल्यु-एक्सवन या पेटलेल्या वाहनाची प्राथमिक स्वरुपात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अजितदादा आणि फडणवीसांना कार्तिकी एकादशीला 'नो एन्ट्री', 'आरक्षण न देता येण्याचा प्रयत्न केल्यास काळे फासू' सकल मराठा समाजाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
Sunetra Pawar on Finance Ministry: अर्थ खातं कोणाकडे? प्रश्नावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उत्तराने भुवया उंचावल्या; म्हणाल्या...
अर्थ खातं कोणाकडे? प्रश्नावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उत्तराने भुवया उंचावल्या; म्हणाल्या...
Pune News: पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलिवूड स्टार्सच्या कार्यक्रमात गोंधळ; शाहिद कपूरला पुण्यात धक्काबुक्की; नियोजनाचा कलाकारांना फटका
पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलिवूड स्टार्सच्या कार्यक्रमात गोंधळ; शाहिद कपूरला पुण्यात धक्काबुक्की; नियोजनाचा कलाकारांना फटका
Rain Updates: पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?
पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?

व्हिडीओ

Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Accident: तीन माय-लेकरांसह आजीचा अंत; एकाच अपघातात सर्व काही हिरावलं; तांदूळवाडी दुर्घटनेत एकाच रात्री आठ जणांवर अंत्यसंस्कार
तीन माय-लेकरांसह आजीचा अंत; एकाच अपघातात सर्व काही हिरावलं; तांदूळवाडी दुर्घटनेत एकाच रात्री आठ जणांवर अंत्यसंस्कार
TMC Rebel MP : तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांचा NCPI मध्ये विलीन होण्याचा निर्णय, खासदारकी वाचणार का? दहाव्या शेड्यूलनुसार नेमकी अट काय?
TMC च्या बंडखोर खासदारांचा NCPI मध्ये विलीन होण्याचा निर्णय, दहाव्या अनुसूचीनुसार खासदारकी वाचणार की जाणार?
Bhimashankar Temple: भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
Share Market : शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली, ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या घोषणेनं अच्छे दिन
शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली,सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजी
Donald Trump on Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली अपडेट, शांतता कराराच्या घोषणेनंतर दिवस सांगितला...
अखेर ट्रम्प यांनी टायमिंग साधलं, बड्डेच्या दिवशीच शांतता कराराची घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार?
Share Market : अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Ek Hota Malin Marathi Movie: 12 वर्षांखाली गाडलं गेलेलं गाव अन्...; थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार मोठ्या पडद्यावर, कधी होणार रिलीज?
12 वर्षांखाली गाडलं गेलेलं गाव अन्...; थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार मोठ्या पडद्यावर, कधी होणार रिलीज?
Embed widget