(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजितदादा आणि फडणवीसांना कार्तिकी एकादशीला 'नो एन्ट्री', 'आरक्षण न देता येण्याचा प्रयत्न केल्यास काळे फासू' सकल मराठा समाजाचा इशारा
एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे. मात्र कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्र्यांना एन्ट्री न देण्याचा निर्धार सकल मराठा मोर्चाने केला आहे.
पंढरपूर: कार्तिकीच्या (Kartiki Ekadashi) शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्याला मिळणार यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. मात्र कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते न करता शेतकऱ्याच्या हस्ते करावी, असे पत्र सकल मराठा मोर्चाने दिले मंदिर समितीला दिले आहे. एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे. मात्र कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्र्यांना एन्ट्री न देण्याचा निर्धार सकल मराठा मोर्चाने केला आहे.
मराठा आरक्षणासाठी सध्या वातावरण तापले आहे. मराठा आरक्षण आंदोलन राज्यभरात आक्रमक होत असून सकल मराठा समाज बांधव देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर संपूर्ण राज्यात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. वारकऱ्यांच्या हस्ते पूजा करा , आरक्षण न देता कोणी येण्याचा प्रयत्न केल्यास काळे फासू असा इशारा समितीने दिला आहे.
मंदिर समितीच्या निर्णयाकडे लक्ष
23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा पार पडणार आहे. दरवर्षी कार्तिकी एकादशीची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाचा वारकरी यांच्या हस्ते होत असते . यंदा दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणाच्या हस्ते पूजा होणार हा पेच सरकार पुढे असताना आता मराठा आंदोलकांनी कोणत्याच मंत्र्याला येऊ न देण्याचा इशारा दिला आहे . कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते न करता शेतकऱ्याच्या हस्ते करावी, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. त्यामुळे आता मंदिर समिती कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मराठा समाजाने घेतलेल्या भूमिकेमुळे मोठा पेच
राज्याच्या राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत असून सध्या राज्याला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत. कार्तिकीच्या पूजेला एकाच उपमुख्यमंत्र्यांनी बोलवावे लागणार असून गेल्या कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली होती. यावर्षी दोन उपमुख्यमंत्री असल्याने नेमका हा मान कोणाला द्यायचा या पेचात मंदिर समिती सापडली होती. परंतु आता सकल मराठा समाजाने घेतलेल्या भूमिकेमुळे मोठा पेच निर्माण होणार आहे.
हे ही वाचा :