Pune Weather Update : पुढील दोन दिवस पुणं गारठणार; ऑक्टोबर हिटपासून पुणेकरांना दिलासा
पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे. पुढील दोन दिवस थंडीची लाट येणार आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
पुणे : ऑक्टोबर हिटनंतर (Pune news) आता पुण्यात काही (Pune Weather Update) दिवस थंडीची लाट येणार आहे. दोन दिवस तापमानात घसरण होणार आहे. हवामानातील या बदलामुळे शहरात यापूर्वी अनुभवलेल्या (october heat) 'ऑक्टोबर हिट'चा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. हवामानातील या बदलामुळे शहरात यापूर्वी अनुभवलेल्या 'ऑक्टोबर हिट'चा प्रभाव कमी होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. पावसाचा जोर ओसरल्याने कोरडे हवामान निर्माण होत आहे. गेल्या आठवडाभरापासून किमान तापमानात सातत्याने वाढ होत असून सरासरीपेक्षा अंदाजे 3 अंशांनी जास्त आहे. साधारणपण पुण्यात किमान तापमान 20 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवलं गेलं आहे.
सोमवारी शहरात ऑक्टोबरमधील सर्वकालीन कमी तापमान अनुभवले आणि ते 18.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले. आतापर्यंत पुण्यात ऑक्टोबरमध्ये इतक्या कमी किमान तापमानाची नोंद झाली नव्हती. शहराचे किमान तापमान 19 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नव्हती. मात्र यंदा सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर कमाल तापमानात चढ-उतार होत असल्याने पुणेकरांना उष्णता आणि थंडी या दोन्हींचा सामना करावा लागला.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुणे आणि आसपासच्या भागात येत्या आठवडाभरात कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. येत्या दोन दिवसांत शहराच्या किमान तापमानात अंदाजे 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज आहे. राज्याच्या विविध भागात किमान तापमानातही घट होऊ लागली आहे. जळगावमध्ये सोमवारी राज्यातील सर्वात कमी तापमान 15 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा किंचित खाली घसरलं आहे.
अरबी समुद्रात 'तेज' चक्रीवादळ तयार झाल्यानंतर आता बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावर सध्या कमी दाबाची प्रणाली सक्रिय असून तिची तीव्रता सातत्याने वाढत आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला कोणताही तत्काळ धोका नसल्याची ग्वाही हवामान खात्याने दिली.
पुणं गारठणार...
हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुणेकरांना ऑक्टोबर हिटनंतर थंडीचा सामना करावा लागणार आहे. पुढील दोन दिवस थंडी वाढणार आहे. मागील काही दिवस पुण्यात उन्हाचे चटके जाणवत होते. या उन्हामुळे पुणेकर हैराण झाले होते. मात्र आता पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे.