Pune Crime : आमच्या आधी मटण का खालं? न्यू इयर पार्टीवेळी 2 मित्रांमध्ये वाद, डोक्यात फावडा घातला; पुण्यातील धक्कादायक घटना
Pune Crime : आमच्या आधी मटण का खालं? असं म्हणत संतापलेल्या मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात फावडा घातलाय.
Pune Crime : "आमच्या आधी मटण का खाल्लं म्हणत मित्रानेच मित्रावर हल्ला केल्याची घटना घडलीये. न्यू इयर पार्टीमध्ये मटण खाल्ल्यावरून 2 मित्रांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर मित्रानेच मित्राच्या डोक्यात फावडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलीये. या हल्लात निगेश म्हेथे हा तरुण या हल्ल्यात जखमी झाला आहे. याप्रकरणी धम्मपाल सोनवणे याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दोघे मित्र एकाच रुमवर होते वास्तव्यास, न्यू इयर पार्टीवरुन मोठा वाद
अधिकची माहिती अशी की, निगेश म्हेत्रे व धम्मपाल सोनवणे हे दोघे ही एकमेकांचे मित्र असून खासगी गाड्यांवर चालक म्हणून काम करतात. इतकंच नाही तर ते दोघेही एकाच खोलीत वास्तव्यास आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने ते पार्टी करत होते. दरम्यान, म्हेत्रे तू आमच्या अगोदर मटण का खातोस? या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात सोनवणेने म्हेत्रे याला शिवीगाळ करत फावडयाचे दांडक्याने त्याच्या डोक्यात मारहाण केली. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागलाय. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केलाय.
आमच्या आधी मटण का खाल्लं म्हणत मित्राने च मित्राला "हाणला"
न्यू इयर पार्टी मध्ये मटण खालल्यावरून २ मित्रांमध्ये वाद
मित्रानेच मित्राच्या डोक्यात घातला फावडा
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना
निगेश म्हेथे हा तरुण या हल्ल्यात जखमी झाला आहे
याप्रकरणी धम्मपाल सोनवणे याच्यावर भारती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नागपुरात पूर्ववैमन्यस्यातून गोळीबार,भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी केला खून
नागपूरच्या खापरखेडा पोलिस स्टेशन हद्दीत गोळीबार झालाय. गँगवारमधून एकाची हत्या करण्यात आलीये. पवन हिरण्वार असं खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेत एक जण जखमी झालाय. संशयित आरोपी शेपू खान यांने आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. बाभुळगाव शिवातून मृतक आपल्या मित्रांसोबत कारने जात असताना चार ते पाच दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी कार अडवून मृतक व त्याच्या मित्रांना बाहेर काढले..जीव वाचवण्यासाठी मृतक व त्याचे पळत असताना आरोपींनी त्यांच्यावर देशी कट्ट्याने गोळीबार केला..यात पवन हिरणवार याला तीन गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर एक जखमी झाल्याची माहिती आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या