एक्स्प्लोर

Pune Crime: मुली कुठे सुरक्षित? दोन दिवसात पुण्यात तीन लैंगिक अत्याचाराच्या घटना! शाळेत, घरात अन् बाहेर फिरायल्या गेलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Pune Crime: सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गेल्या दोन दिवसांमध्ये तीन अत्याचाराच्या संतापजनक घटना समोर आल्या आहेत. यामधील दोन घटनांमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे, तर एका घटनेत तरूणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची माहिती आहे.

पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये अत्याचाराच्या घटनांनी राज्याभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गेल्या दोन दिवसांमध्ये तीन अत्याचाराच्या संतापजनक घटना समोर आल्या आहेत. यामधील दोन घटनांमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे, तर एका घटनेत तरूणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची माहिती आहे. या तीन घटनांवरून महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र दिसून येत आहे. एका घटनेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर शाळेला जाणाऱ्या स्कुलबसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली, तर दुसऱ्या एका घटनेत आपल्या जन्मदात्या नराधम बापाने आपल्या मुलीवर घरातच अश्लील व्हिडिओ दाखवत गेल्या एका वर्षापासून लैंगिक अत्याचार केला, तर तिसरी घटना म्हणजे आपल्या मित्रासोबत पुण्याच्या जवळच असलेल्या बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली असतानाच 21 वर्षीय तरूणीचे अपहरण करून तिच्यावर येवलेवाडी परिसरात तिघांनी सामूहिक अत्याचार केला, या घटनांनी शहर हादरले आहे. 

पुण्यातील त्या संतापजनक घटना कोणत्या?

1) 8 वर्षांच्या दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार

स्कुल बस ड्रायव्हरने दोन आठ वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वानवडी भागात समोर आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 45 वर्षांच्या स्कुल बस ड्रायव्हरला अटक केली आहे. 30 सप्टेंबरला हा स्कुल बस ड्रायवर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहचला. शाळा सुटल्यावर मुलींना पुन्हा घरी  सोडताना त्याने आठ वर्षांच्या दोन पिडित मुलींना ड्रायव्हरच्या केबीनमधे बोलावले आणि त्यांच्यासोबत अश्लील चाळे केले. एका पिडीत मुलीने याबाबत पालकांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर तक्रार दाखल केली, पोलिसांनी या प्रकरणी ड्रायव्हरला अटक करण्यात आली. पिडीत मुलींची प्रकृती व्यवस्थीत आहे. नियमाप्रमाणे प्रत्येक स्कुल बसमधे एक महिला केअर सेंटर असणं बंधनकारक आहे. या स्कुल बसमधील महिला केअर टेकर यावेळी स्कुल  बसमधे होती का हा प्रश्न उपस्थित होतोय. 

पोलिसांनी याप्रकरणी काय म्हटलंय? 

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 अल्पवयीन मुलींच्या आईंची तक्रार आहे. त्यांच्या दोन मुलींच्या प्रायव्हेट पार्टला टच केल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. आरोपीला अटक केली आहे. स्कूल बस मध्ये महिला मदतनीस होती का याचा तपास करत आहोत. स्कूल बस शाळेची होती की, भाडेतत्त्वावर घेतलेली याबाबत माहिती घेत आहोत. विद्यार्थी वाहतुकी संदर्भात नियमांचा उल्लंघन झालं का याचा तपास करत आहोत. शाळा प्रशासनाशी संपर्क सुरू आहे. जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे.

2) पोटच्या मुलीवर वर्षभरापासून अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना पुणे शहरात समोर आली. पुण्यातील वारजे परिसरात राहणाऱ्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच गेल्या एक वर्षापासून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तर या घटनेचा उलगडा शाळेतील गुड टच बॅट टच उपक्रमातून उघडकीस आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर नराधम बापाला पुणे पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. पंकज देवेंद्र ठाकूर वय 35 असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो मुळचा बिहारचा राहणारा आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या एका वर्षापासुन तो मुलीला चक्क अश्लील व्हिडिओ दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता आणि आरोपीच्या मोबाईलमध्ये असे अश्लील व्हिडिओ देखील आढळले असल्याची माहिती पुणे पोलीसांकडून देण्यात आली आहे.

घटना कशी आली उघडकीस?

ही धक्कादायक घटना शाळेतील गुड टच बॅड टच उपक्रमातून उघडकीस आली. शिक्षकांनी दिलेल्या तक्रारीनंतर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यामध्ये नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

3) बोपदेव घाटात मित्रासोबत गेलेल्या तरूणीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार

पुण्याजवळील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत  अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिघांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर आता संताप व्यक्त केला जात आहे, काल (गुरूवारी) पोलिस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर संतप्त जमाव एकत्रित आला होता, त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबाबत संतापजनक पोस्ट आपल्या सोशल मिडिया शेअर केली आहे, त्यानंतर आता या घटनेबाबत पोलिसांनी संपूर्ण माहिती दिली आहे. 

पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी

पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, काल (गुरूवारी) रात्री 21 वर्षीय मुलगी आपल्या मित्रासोबत पुण्याजवळील बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती. रात्री 11च्या सुमारास ते तिथे गेले होते. 3 लोकांनी मुलांना मारहाण करत अतिप्रसंग केला आहे. या घटनेची माहिती आपल्याला आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मिळाली. या प्रकरणात एकुण 10 पथकं कामाला लावली आहेत. अनेक लोकांची चौकशी सुरु आहे. एकुण 3 मुलं आहेत त्यांचा शोध सुरु आहे. मुलगी बाहेर राज्यातील आहे. बोपदेव घाटात नेहमी लोक वॉकिंगला जातात. यावेळी ही घटना समोर आली, मारहाण करत मित्राला त्याठिकाणी बाधून ठेवलं होतं. मुलगी गंभीर जखमी आहे, तिच्यावरती देखील उपचार सुरु आहेत. आरोपी पुर्णपणे निष्पन्न झालेले नाहीत. पिडीत मुलगी 21 वर्षाची आहे. दोघेही कॉलेजमध्ये शिक्षण घेतं आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jyoti Gaikwad - Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांची बहीणीसोबत एन्ट्री,वडिलांच्या आठवणीने डोळे पाणावलेAbu Azmi Left MVA : विरोधकांचा आमच्याशी काही संबंध नाही, अबू आझमींचा मविआवर गंभीर आरोपSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav : सुधीर मुनगंटीवार विधानभवनात दाखलSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav Video:हातात हात घालून जाधव- मुनगंटीवार यांची विधानभवनात एँट्री

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
Surabhi Hande : सुरभी हांडे 10 वर्षांनी पुन्हा म्हाळसाच्याच भूमिकेत! 'आई तुळजाभवानी' मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री
सुरभी हांडे 10 वर्षांनी पुन्हा म्हाळसाच्याच भूमिकेत! 'आई तुळजाभवानी' मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री
त्यांचे लाखोंनी चाहते, भेटण्यासाठी फॅन्स झुरायचे, 'असे' चार ॲक्टर्स ज्यांच्या मृत्यूचं रहस्य कोणालाच माहिती नाही!
त्यांचे लाखोंनी चाहते, भेटण्यासाठी फॅन्स झुरायचे, 'असे' चार ॲक्टर्स ज्यांच्या मृत्यूचं रहस्य कोणालाच माहिती नाही!
राज्यात बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीची भांडाफोड, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, वाचा स्पेशल रिपोर्ट
राज्यात बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीची भांडाफोड, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, वाचा स्पेशल रिपोर्ट
Embed widget