Pune Crime : आता बाप बाहेर आलाय, मोक्कामधून सुटलेल्या कुख्यात गुंडासाठी येरवडा परिसरात रॅली Video
Pune Crime : मोक्कामधून सुटलेल्या कुख्यात गुंडासाठी येरवडा परिसरात रॅली काढण्यात आली होती.
Pune Crime : पुण्यात (Pune Crime) मोक्कामध्ये सुटलेल्या कुख्यात गुंडाची जेलमधून बाहेर आल्यानंतर आलिशान कारमधून रॅली काढली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मोक्कामध्ये येरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल उर्फ गुड्या गणेश कसबे हा 2 दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सुमारे 50-60 समर्थकांनी येरवडा बाजार परिसरात आलिशान कारमधून रॅली काढली. आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली. व्हिडिओ आणि घडलेल्या प्रकाराबाबत नागरिकांनी Laxmi नगर (शास्त्रीनगर) पोलीस चौकीमध्ये माहिती दिली पण कारवाई झाली नाही, असे नागरिकांचं म्हणणे आहे. त्यामुळे पुण्यात (Pune Crime) गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय..
View this post on Instagram
प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबे याच्यावर गंभीर गुन्हे
2021 मध्ये पुणे शहरातील गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला होता. पुणे शहरातील येरवडा परिसरामध्ये खुनी हल्ला करुन दहशत पसरवणाऱ्या टोळीवर गँगच्या म्होरक्यासह 13 जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. यात टोळी प्रमुख प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबे याच्यावर मोक्का कारवाई झाली होती. आरोपी कसबे याने गुन्हेगारांची टोळी तयार करुन वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे केले आहेत. आरोपींवर टोळीचे वर्चस्व निर्माण करुन खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, पुण्यातील आय टी कंपनीमध्ये अकांऊट म्हणून ती कार्यरत असलेल्या तरुणीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करत तिचा खून करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. रक्तस्त्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली होती. शुभदा कोदारे असे या तरुणीचे नाव होते. कंपनीच्या पार्किंगमध्ये तिच्यावर तिच्याच सहकाऱ्याने तिच्या हाताच्या कोपऱ्यावर वार केले होते. या हल्ल्यात शुभदा गंभीर जखमी झाली होती. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात कृष्णा कनोजा याला अटक करण्यात आली आहे.
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...#WalmikKarad #hospital #eyeinfection #Beedcrime #SantoshDeshmukh https://t.co/gGwpm4mftK
— ABP माझा (@abpmajhatv) January 9, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या