एक्स्प्लोर

Maharashtra Local Body Election: महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता

दुसरीकडे प्रभाग आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 18 इतर जिल्हा परिषदेमध्ये अजूनही संभ्रमावस्था कायम आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असेल.

Maharashtra Local Body Election: महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आल्यानंतर आता राज्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडण्याची शक्यता आहे. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुद्धा घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरसह जिल्हा 14 जिल्हा परिषदांची निवडणूक 23 ते 30 डिसेंबरच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. 

कोणत्या जिल्हा परिषदांची निवडणूक होऊ शकते?

पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, बीड, परभणी, धाराशिव आणि अहिल्यानगर या 14 जिल्हा परिषदांची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रभाग आरक्षणाची स्थिती कायदेशीर असल्याने निवडणूक घेण्यामध्ये कोणतीही अडचण नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यांमध्ये या जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक होऊ शकते आणि दुसरीकडे प्रभाग आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 18 इतर जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीची अजूनही संभ्रमावस्था कायम आह. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असेल.

सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका प्रक्रिया पूर्ण करण्याचे  निर्देश दिले आहेत. त्यानुसार आयोगासमोर कोणत्याही परिस्थितीत निवडणूक घेण्याचे आव्हान आहे. अशा स्थितीत सर्वच निवडणुका एकाच वेळी घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागू शकते. अशा स्थितीत जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मुदतवाढ घेतली जाऊ शकते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन टप्प्यात निवडणुका घेऊन निवडणुका पार पाडणार की मुदतवाढ घेऊन एकाच टप्प्यांमध्ये सर्व झेडपी निवडणुका घेणार याकडे सुद्धा लक्ष असेल. ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहेत, त्या संदर्भातील वर्धा जिल्ह्यातील दाखल केलेल्या याचिकेवर 18 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे. य निर्णयावर जिल्हा परिषद निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असेल. 

महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता 

दरम्यान, बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या आधीन राहून राबविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना 16 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांची अधिसूचना 18 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर पार पाडतील. सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला महानगरपालिका कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर 4 नोव्हेंबर 2025 रोजी कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातदेखील आदेश निर्गमित केले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Goverment Cabinet Decision: देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
Maharashtra News LIVE Updates: अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी देशव्यापी बंद; बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बंदची भूमिका
Maharashtra News LIVE Updates: अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी देशव्यापी बंद; बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बंदची भूमिका
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेवरून महायुतीत मोठा ‘गृहकलह’; कोकणच्या जागेसाठी राजन साळवी विरूद्ध तटकरे सामना, पुण्यात राष्ट्रवादीच्या जागेवर भाजपचा डोळा, नेमकं काय घडतंय?
विधान परिषदेवरून महायुतीत मोठा ‘गृहकलह’; कोकणच्या जागेसाठी राजन साळवी विरूद्ध तटकरे सामना, पुण्यात राष्ट्रवादीच्या जागेवर भाजपचा डोळा, नेमकं काय घडतंय?
Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला

व्हिडीओ

Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका
Sudhir Mungantiwar Nanded : मंत्रीपद माझ्यासाठी सर्वकाही नाही, मी जनतेचा आवाज उठवणारा! | ABP Majha
Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
Palghar Accident: 12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
Pandharpur News : पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ; युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षच्या व्हीआयपी दर्शनासाठी गेटवर धक्काबुक्की,
पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ; युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षच्या व्हीआयपी दर्शनासाठी गेटवर धक्काबुक्की
Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत
IPL 2026 Playoffs Qualification Scenarios: जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
Vidhan Parishad Election NCP Candidates: विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'ते' दोन नेते सुनेत्रा पवारांना भेटायला पोहोचले, पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार?
विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'ते' दोन नेते सुनेत्रा पवारांच्या भेटीला, पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार?
Embed widget