एक्स्प्लोर

Ankita Walawalkar On Dhurandhar Movie: 'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?

Ankita Walawalkar On Dhurandhar Movie: 'धुरंधर' सिनेमानंतर सोशल मीडियावर सुरू झालेल्या एका ट्रेंडमुळे मात्र अंकिताची तळपायाची आग मस्तकात गेलीय. तिनं सोशल मीडियावर पोस्ट करुन आपलं स्पष्ट मत व्यक्त केलंय. 

Ankita Walawalkar On Dhurandhar Movie: सध्या 'धुरंधर' सिनेमा (Dhurandhar Movie) सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिसवर (Dhurandhar Box Office Collection) कब्जा केलाय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 'धुरंधर'मध्ये बॉलिवूडसह टेलिव्हिजनवरची तगडी स्टारकास्ट झळकली आहे. रणवीर सिंह (Ranveer Singh), अक्षय खन्ना (Akshaye Khanna), संजय दत्त (Sunjay Dutt), अर्जुन रामपाल यांसारखे बॉलिवूडचे (Bollywood) दमदार स्टार्सही या सिनेमात दिसलेत. यांच्या अभिनयानं सिनेमाला तर चार चाँद लावले आहेत. हिंदी सिनेसृष्टीतून 'धुरंधर'वर कौतुकाचा वर्षाव केला जातोय, पण मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, इन्फ्लुएन्सर्सही 'धुरंधर'चं कौतुक करत आहेत. यामध्ये प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 'कोकण हार्टेड गर्ल' (Kokan Hearted Girl) अंकिता वालावलकरचाही (Ankita Prabhu Walawalkar) समावेश आहे. अंकितानं 'धुरंधर' सिनेमाचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. पण, त्यासोबतच 'धुरंधर' सिनेमानंतर सोशल मीडियावर सुरू झालेल्या एका ट्रेंडमुळे मात्र अंकिताची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. याबाबत तिनं स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करुन आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. 

'धुरंधर' पाहिल्यावर अंकिता वालावलकर काय म्हणाली? 

"माझ्यावर विश्वास ठेवा... 'धुरंधर' पाहणं म्हणजे, Worth Every Minute! चित्रपट पाहताना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही, कारण यातला प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे...", असं अंकिता वालावलकर म्हणाली. 

सोशल मीडियावरच्या 'Day 1 As a Spy'  ट्रेंडवरुन अंकिता चिडली, काय म्हणाली? 

'धुरंधर' सिनेमानंतर सरू झालेल्या 'Day 1 As a Spy' या ट्रेंडवरुन मात्र अंकिता वालावलकर चिडलीय. अंकिताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय की, "Spy वर मस्करी करून reel बनवणं म्हणजे विनोद नाही तर अज्ञान आहे. त्यांचं आयुष्य कंटेंट नाही, तो दररोजचा धोका आहे. थोड्या views साठी देशासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्यांची थट्टा करणं हे IQ नाही, हे संवेदनशून्यपणाचं प्रदर्शन आहे. Spy बनायला फक्त attitude नाही तर, मेंदू, धैर्य आणि त्याग लागतो. तुमच्या reels मुळे चित्रपट promote होतील, पण त्यामागे असलेली देशसेवा, देशासाठी जगणाऱ्यांची किंमत कमी होतेय हे लक्षात ठेवा. एकदा स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघा. नाव विसरावं लागतं, कुटुंब विसरावं लागतं, आणि तरीही देश पहिला... Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

सोशल मीडियावरचा 'Day 1 As a Spy'  ट्रेंड आहे तरी काय? 

'धुरंधर' सिनेमानंतर सोशल मीडियावर 'Day 1 As a Spy' हा ट्रेंड तुफान गाजतोय. यामध्ये इन्फ्लूएन्सर स्वतःला सीक्रेट एजन्ट असून पाकिस्तानात मिशनसाठी आल्याचं सांगतात. पण, पाकिस्तानात सीक्रेटपणे वावरत असताना अगदी आपल्या दैनंदिन जीवनातील साध्या सवयींमुळे पकडले जातात, असं या ट्रेंडी व्हिडीओत दाखवण्यात येतं. अगदी साध्या सवयी म्हणजे, गुरुवारी बिर्याणी खायला नकार देणं, कुणाला पाय लागला की, पाया पडणं किंवा गायीला नमस्कार करणं... यांसारख्या अनेक सवयी या ट्रेंडी व्हिडीओ करण्यासाठी वापरण्यात आल्यात. पण, अंकिता वालावलकरला मात्र सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा हा ट्रेंड अजिबातच पटलेला नाही. यावरुन तिनं असे रिल्स बनवणाऱ्यांना चांगलंच झापलंय. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget